महामार्गाची अपुर्ण कामे पुर्ण करण्याच्या मागणीसाठी कडेपूर येथे रास्ता रोको

Google search engine
Google search engine

महामार्गाची अपुर्ण कामे पुर्ण करण्याच्या मागणीसाठी कडेपूर येथे रास्ता रोक

 

 


सांगली/कडेगांव न्युज:
गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गाची (166 ई) अपुर्ण कामे तात्काळ पुर्ण करावीत तसेच दिशा दर्शक व महामार्गावरील गावांच्या नावाचे फलक लावावेत आदी मागण्यांसाठी कडेपूर (ता.कडेगाव) येथे मुख्य चौकात सरपंच सतीश देशमुख यांचे नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी बोलताना सतीश देशमुख म्हणाले,गुहागर-विजापूर महामार्गावर कडेपूर गावामध्ये गावाच्या नावाचा फलक लावलेला नाही,बस स्थानकासमोरील गटर काम अपूर्ण आहे.बसस्थानकाच्या गेट जवळ रस्ता डांबरीकरण करावा,तसेच गावातील चौकात बसविणेत आलेल्या स्ट्रीट लाईट बंद आहेत.त्या तात्काळ सुरु कराव्यात.तसेच जादा उंचीचे व गतिरोधक काढून तेथे कमी उंचीचे गतिरोधक बसवावेत.आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज कडेपूर येथे बस थांब्यावर पिक अप शेड उभारावे.
येथील मुख्य चौकात आज सकाळी सरपंच सतीश देशमुख यांचे नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.आंदोनात ग्रामस्थ व महिलांनी उस्फुर्त सहभाग घेतला होता. यावेळी गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्ग व सांगली-पुसेसावळी रस्त्यावरील वाहतुक ठप्प झाली होती.तर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.यावेळी भाजपचे किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड यांचेसह गावातील विविध मान्यवरांनी भाषणे केली.
यावेळी माजी सरपंच पंजाबराव यादव,धनाजी यादव,हिंदुराव यादव, विश्वजित यादव,भरत यादव,अजित यादव आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.आंदोलनस्थळी कडेगाव पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
दरम्यान राष्ट्रीय महामार्ग (कोल्हापूर विभाग) उपअभियंता प्रकाश शेडेकर यांनी आंदोलनस्थळी भेट देवून महामार्गाबाबतच्या ग्रामस्थांच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या जातील असे आश्वासन दिल्याने रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले.
…………….…………

……………………..….