कडेगांव तालुक्यातील चिंचणी येथील रामलिंग रथोत्सव यात्रा महालक्ष्मी दिनदर्शिका मध्ये समाविष्ट 

0
132
Google search engine
Google search engine

चिंचणीतील रामलिंग रथोत्सव यात्रा महालक्ष्मी दिनदर्शिका मध्ये समाविष्ट

 

 

 

 

सांगली/कडेगांव न्युज:

प्रभू श्री रामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कडेगांव तालुक्यातील चिंचणी (वांगी) येथील गेली अनेक वर्षे  महाशिवरात्रीला अखंडित सुरू असणारी श्री रामलिंग रथोत्सव यात्रा ही महाराष्ट्रभर खप असणाऱ्या सुप्रसिद्ध अशा महालक्ष्मी दिनदर्शिकेमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.यासाठी विशेष सहकार्य मा.आ.पृथ्वीराज देशमुख बाबा यांचे लाभले आहे, असे कै.पै.महादेव महाडीक मेमोरियल फौडेशन चे अध्यक्ष अभिजीत महाडीक यांनी सांगितले.

यावेळी चिंचणीतील श्री राम मंदिरात ‘श्री रामलिंग रथोत्सव यात्रा’ ची महालक्ष्मी दिनदर्शिकेत नोंद केलेल्या कॅलेडंरचे प्रकाशित विशेषतः महिलांच्या हस्ते करण्यात आले.

सोनहिरा परिसरातील सर्व राम भक्त तसेच चिंचणी ग्रामपंचायत यांच्या विशेष प्रयत्नांनी अभिजीत महाडीक मित्रमंडळी यांच्या संकल्पनेने तरुण सहकारी यांच्या पुढाकाराने २०२४ सालच्या दिनदर्शिकेमध्ये यात्रेचा उल्लेख व्हावा यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आला.

चिंचणी गावाचा नावलौकिक वाढवणारी ही अभिमानस्पद नोंद उल्लेखनीय आहे. यासाठी गावातील सर्व राम भक्त मिळून मा.आ. पृथ्वीराज देशमुख बाबा यांचा सत्कार करणार असल्याचे अभिजीत महाडीक यांनी पुढे सांगितले. येणारी पुढील २०२४ सालातील यात्रा ही ९ मार्च (शके माघ.कृष्ण १४ महाशिवरात्री च्या दुसऱ्या दिवशी) असून मोठ्या उत्साहात साजरी करणार असल्याचे असे गावातील सर्व राम भक्तांनी सांगितले.