भाजपाला अल्पसंख्याक बांधवांची भरभरून साथ – तोंडोलीतील कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश :कार्यकर्त्यांशी जिवाभावाचे नाते असावे हि स्व. अण्णांची शिकवण – संग्रामसिंह देशमुख 

0
558
Google search engine
Google search engine

भाजपाला अल्पसंख्याक बांधवांची भरभरून साथ – तोंडोलीतील कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश

:कार्यकर्त्यांशी जिवाभावाचे नाते असावे हि स्व. अण्णांची शिकवण – संग्रामसिंह देशमुख

 

 

 

सांगली/कडेगांव न्युज

भारतीय जनता पार्टी ही जातीयवादी आहे असा जाणीवूर्वक खोटा प्रचार आपल्या विरोधकांकडून आजवर केला गेला. परंतु देशभरातील विविध निवडणुकांचे निकाल पाहता भाजपाला अल्पसंख्याक बांधवांनी भरभरून साथ दिल्याचे उघड होत आहे. आता जनता खोट्या प्रचाराला बळी तर पडणार नाहीच शिवाय  विकासाच्या आधारावर व आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन जी मंडळी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत त्यांना अपेक्षित काम करून तालुक्याचा विकास साधला जाईल अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी दिली

तोंडोली ता. कडेगाव येथील कॉंग्रेस पक्षातील रहीमबक्ष गुलाब बागवान, सर्फराज रहीमबक्ष बागवान, आजीज रहीमबस बागवान यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांचा सत्कार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.

ते पुढे म्हणाले कडेगाव पलुस मतदार संघातील भारतीय जनता पक्ष हा पक्ष नाही तर आपला परिवार आहे, कार्यकर्त्यांशी जिवाभावाचे नाते असावे हि स्व. संपतराव अण्णा देशमुख यांची आम्हांला शिकवण आहे. त्यांनी दिलेल्या वाटेवरून आम्ही मार्गक्रमण करत आहोत. येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या शब्दाला किंमत दिली जाईल. आपणाकडून जे विकासाचे राजकारण सुरू आहे ते असेच अविरतपणे सुरू राहिल असेही देशमुख यांनी सांगितले.

यावेळी अॅड. सत्यजीत यादव देशमुख,सतिश यादव,श्रीजय देशमुख, विकास भोसले,धोंडीराम भोसले, आबासो करांडे ,रविंद्र दुबिले, प्रदिप दुबिले,हिंदुराव यादव,सर्जेराव मोहीते सर, प्रमोद मोहिते फौजी, सुनिल मोहीते, अहमदअली बागवान यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.