कडेगाव बस स्टँड समोरील छ. संभाजी महाराज चौकात निषेध मोर्चा*

0
360
Google search engine
Google search engine

*कडेगाव बस स्टँड समोरील छ. संभाजी महाराज चौकात निषेध मोर्चा

 

 

 

सांगली/कडेगांव न्युज

पलूस कडेगाव राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी व पाणी संघर्ष समिती अध्यक्ष डी एस देशमुख व राष्ट्रवादी पदाधिकारी पाणी संघर्ष समिती संयोजक यांनी प्रभारी प्रांताधिकारी उपविभाग कडेगाव यांना व राष्ट्रीय महामार्ग विभाग कोल्हापूर यांना निवेदन दिले आहे.

सदर निवेदनात कराड ते विजापूर महामार्ग मधील अपूर्ण कामे पूर्ण करावीत व तोपर्यंत येवलेवाडी येथील टोलनाका सुरू करू नये असे म्हटले आहे. अपूर्ण कामे अनेक वेळा आंदोलने करून सुद्धा पूर्ण झाली नाहीत. यासाठी शुक्रवारी दिनांक 29 डिसेंबर रोजी त्याच्या निषेधार्थ मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
महामार्गावरील जाचक स्पिडब्रेकरची उंची कमी करावी, सुर्ली घाटाचे काम चार पदरी होण्यासाठी प्रस्ताव मंजूर करावा, नागज व रेणावी घाटातील रस्ता रुंदीकरण करणे व धोकादायक वळणे काढून टाकावीत. महामार्गाकडेची तोडलेली झाडे लावणे (वृक्षारोपण) नियमानुसार करावे. व कडेगाव शहरातील अपूर्ण नाले रस्त्याच्या दोन्ही बाजूला पूर्ण करणे. यासह अनेक कामे पूर्ण व्हावीत मागणीसाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी जगदीश महाडिक, सुरेश शिंगटे, सोमनाथ पवार, दिपक ज्ञायनीत, बजरंग अडसूळ, नामदेव रासकर, विशाल जाधव, किरण कुराडे, आसिफ इनामदार, अप्पा यादव उपस्थित होते.