कडेगांव येथील ऐतिहासिक श्रीराम मंदिरात ३२ वा प. पु. श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज पुण्यतीथी महोत्सवाचे आयोजन

0
161
Google search engine
Google search engine

 

 

 

 

 

 

 

 

सांगली/कडेगांव न्युज:

प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही प. पु. श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा पुण्यतीथी सोहळा बुधवार दिनांक २७/१२/२०२३ ते शनिवार दि. ६/०१/२०२४ अखेर कडेगांव येथील श्रीराम मंदिरात संपन्न होत आहे अशी माहीती गोंदवलेकर महाराज पुण्यतीथी महोत्सवाचे यजमान ॲड. अजित कुलकर्णी यांनी सांगितले.
ॲड. अजित कुलकर्णी माहीती देताना पुढे म्हणाले की, या महोत्सवात गेल्या ३२ वर्षात अनेक यज्ञ, याग व विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक दिग्गज किर्तनकार, प्रवचनकार, वादक, गायक, वक्ते, भजनीमंडळे यांनी सेवा रूपी पुष्प श्री गोंदवलेकर महाराजांच्या चरणावर वाहुन कार्यक्रमाची व कडेगावकरवासीयांची शोभा वाढवली आहे. कै. श्री रणभोर गुरूजी यांनी सुरू केलेला हा उत्सव महाराजांच्या आशिर्वादाने अधिकच आकर्षक व समाजप्रबोधनाचे माध्यम होत आहे. दैनंदिन कार्यक्रम सकळी ९ ते ११ महापुजा, सायंकाळी ४ ते ६ प्रवचन, व्याख्यान, भजन, भक्तीगीते सायंकाळी ६ ते ६.३० सायंआरती रात्री ह. भ. प. शेखर अभ्यंकर यांचे सुश्राव्य किर्तन याशिवाय सुमधुर व मोहक आवाजाने व अभिनयाने हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीत नावारूपास आलेले अमोल बावडेकर यांचा गीतगायन कार्यक्रम शुक्रवार दिनांक ५/०१/२०२४ रोजी दुपारी ३.३० ते ६.३० होणार आहे तरी कडेगांव शहरातील रसिक श्रोत्यांनी व भक्तगणांनी या संधीचा लाभ असे अवाहन ॲड. अजित कुलकर्णी यांनी केले आहे.