सर्वसामान्य जनतेने लोककल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा.माजी आमदार पृथ्वीराज देशमुख. सांगली जिल्ह्यातील कडेगाव शहरात विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेला उस्फूर्त प्रतिसाद.

Google search engine
Google search engine

सर्वसामान्य जनतेने लोककल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा.माजी आमदार पृथ्वीराज देशमुख.

  • सांगली जिल्ह्यातील कडेगाव शहरात विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेला उस्फूर्त प्रतिसाद
  • सांगली/कडेगांव न्युज:

 

 

 

 

विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ गावोगावी जाऊन केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनांबद्दल जागरूकता निर्माण व्हावी व जास्तीत जास्त नागरिकांना या योजनांचा लाभ मिळावा या उद्देशाने केंद्र शासनामार्फत विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले. या मोहिमेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा कंदील दिला असुन प्रधान मंत्री स्वनिधी योजना, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री उज्वला योजना, आयुष्यमान भारत योजना अंतर्गत आभा/ गोल्डन कार्ड काढणे, आधार कार्ड अद्यावतिकरण, उज्वला योजने बरोबर इतर योजनांची माहिती तसेच लाभ देणेत येणार आहे. तरी या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आव्हान माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख यांनी केले. ते कडेगाव नगरपंचायतीमध्ये विकसित भारत संकल्प यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते.

यावेळी नगराध्यक्ष धनंजय देशमुख, तहसीलदार अजित शेलार, मुख्याधिकारी सोनाली यादव, ओबीसी भाजप जिल्हा अध्यक्ष प्रकाश गडळे, भाजप तालुका अध्यक्ष अशोक साळुंखे, संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष महेंद्र पवार, उपनगराध्यक्ष नाजनीन पटेल, बांधकाम सभापती अमोल डांगे यांच्यासह सर्व नगरसेवक सभापती प्रमूख उपस्थित होते.

कडेगांव शहरामध्ये IEC VAN दाखल झाल्यानंतर जि.प. शाळेच्या मुलांनी लेझीम पथक ,भारती विद्यापीठ यांनी मानवी मनोरा , महात्मा गांधी विद्यालय यांचा विध्यार्थानी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करुन या रथाचे जोरदार स्वागत केले. या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेत विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेमध्ये सहभाग नोंदवला.

यावेळी भाजपा महिला तालुकाध्यक्ष सांजवीनी डांगे, नगरसेवक विजय गायकवाड, निलेश लंगडे, शुभदा देशमुख, नाजमाबी पठाण, दीपा चव्हाण, विद्या खाडे, रंजना लोखंडे, मनीषा राजपूत, सुनील गाढवे, संतोष डांगे, श्रीजय देशमुख, सुरेश नकाते, रियाज इनामदार, इम्तियाज शेख, दादा
गायकवाड़, विजय खाडे, सदाशिव माळी, किशोर मिसाळ, विलास धर्मे, बाळूरासकर, मकरंद रणभोर, शुभम रजपूत, दशरथ चन्ने, संतोष शिराळकर, युवराज राजपूत. यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते