प्रा. डॉ.गजानन माळी नॅशनल सीनियर टीचर अवॉर्ड ने सन्मानित

Google search engine
Google search engine

प्रा. डॉ.गजानन माळी नॅशनल सीनियर टीचर अवॉर्ड ने सन्मानि
सांगली/कडेगांव न्युज

 

 

 

 

भा भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या यशवंतराव मोहिते महाविद्यालय एरंडवणे पुणे येथील सूक्ष्मजीवशास्त्राची प्रा. डॉ. जी. व्ही. माळी यांना नुकतेच सीनियर टीचर 2023 अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.मायक्रो बायोलॉजिस्टस सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने दरवर्षी सूक्ष्मजीवशास्त्र आणि जैतंत्रज्ञान या विषयातून शैक्षणिक संशोधनात्मक तसेच सामाजिक असे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांना हा पुरस्कार दिला जातो. मायक्रो बायोलॉजीस्टस सोसायटीच्या निवड समितीने 2023 सालच्या या पुरस्कारासाठी डॉ. जी. व्ही. माळी यांची निवड केली होती. या पुरस्काराचे वितरण नुकतेच भारथीदासन विद्यापीठ तिरुचिरापल्ली तामिळनाडू येथे करण्यात आले. सूक्ष्मजीव शास्त्रातील संशोधन वर्तमानातील आव्हाने आणि भविष्यातील दृष्टिकोन या विषयावर मायक्रोबायोलॉजीस्टस सोसायटी आणि भारथीदासन विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 9 ते 11 जानेवारी रोजी आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन या ठिकाणी केले होते. मेडल स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अरविंद देशमुख व भारथीदासन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एम सेल्वम यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ थिरुवल्लूवर विद्यापीठ वेल्लोर तसेच व्हीआयटी विद्यापीठ भोपाळचे माजी कुलगुरू डॉ. पी गुणशेखरंन इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आसाम येथील विभागीय केंद्राचे संचालक प्रा. डॉ. के नटराजाश्रीनिवासन आदी मान्यवर उपस्थित होते. देश-विदेशातील सुमारे 200 संशोधक या परिषदेमध्ये सहभागी झाले होते, डॉ. जी व्ही माळी यांचे मूळ गाव आरग जिल्हा सांगली यांनी कडेगाव येथील भारतीय विद्यापीठ मातोश्री बयाबाई श्रीपतराव कन्या महाविद्यालय तून अध्यापनाची सुरुवात केली. येथील सुमारे 28 वर्षाच्या सेवेनंतर गेल्या दोन वर्षापासून पुणे येथील यशवंतराव मोहिते महाविद्यालयात उपप्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. डॉ. माळी यांनी कृषी आणि पर्यावरण सूक्ष्मजीवशास्त्राशी संबंधित अनेक शोध निबंध प्रसिद्ध केले केले असून अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी पदवी प्राप्त केली आहे. शिवाजी विद्यापीठाच्या सूक्ष्मजीवशास्त्र अभ्यास मंडळावर पंधरा वर्षे सदस्य म्हणून कार्यरत होते. सध्या ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तसेच भारती विद्यापीठाच्या अभ्यास मंडळ व संशोधन समितीवर कार्यरत आहेत.सर्वसामान्य विद्यार्थ्यांना आपला विषय सोप्या भाषेत अवगत व्हावा यासाठी त्यांनी अनेक पुस्तकांची लिखाण केले असून युट्युब च्या माध्यमातून त्यांनी आपला विषय तळागाळातील विद्यार्थ्यापर्यंत पोचवण्याचे कार्य केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या विश्वकोश निर्मिती मंडळामार्फत प्रकाशित करण्यात येणाऱ्या मराठी विश्वकोश मध्ये डॉ. माळी यांनी आपल्या विषयाची मराठीतून लिखाण करून योगदान दिले आहे. कोरोनाच्या काळात वृत्तपत्र व आकाशवाणीच्या माध्यमातून जनजागृती चे काम माळी यांनी केले आहे. विद्यार्थ्यांची मानसिकता आणि वर्तमान परिस्थिती तसेच नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या मध्ये संशोधनाची वृत्ती जागृत करून त्यांच्या विचार आणि कृतीला वाव देण्याचे कार्य डॉ. माळी यांनी नेहमीच केले आहे. या सर्व गोष्टींची दखल घेऊन मायक्रोबायोलॉजीस्टस सोसायटीच्या वतीने देश पातळीवर देण्यात येणारा सर्वोत्कृष्ट पुरस्कार डॉ. माळी यांना प्रदान करण्यात आला असे यावेळी बोलताना मायक्रोबायोलॉजिस्टस सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अरविंद देशमुख म्हणाले. मायक्रो बायोलॉजिस्टस सोसायटीच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून देशभरात व देश बाहेरील विविध उपक्रम राबवली जातात. या विषयाशी संबंधित राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे परिसंवाद तसेच व्याख्यानाचे आयोजन विविध स्पर्धा संशोधनासाठी शिष्यवृत्ती,सामंजस्य करार सामाजिक उपक्रम इत्यादी राबवले जातात. शासन व विद्यापीठ पातळीवरील या विषयाशी संबंधित अनेक प्रश्न या सोसायटीच्या माध्यमातून सोडविण्यात आले आहेत.
भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांचा आदर्श समोर ठेऊन कार्यवाह डॉ विश्वजित कदम आणि कुलपती डॉ शिवाजीराव कदम यांच्या प्रेरणेने विद्यार्थ्यांचे हीत डोळ्यासमोर ठेवून शिक्षणक्षेत्रात काम केल्यामुळेच हा पुरस्कार मला प्राप्त झाला अशा भावना डॉ माळी यांनी यावेळी व्यक्त केल्या