मानधन नको वेतन हवे या मागणीसाठी अंगणवाडी सेविकांचा कडेगांवात मोर्चा

Google search engine
Google search engine

मानधन नको वेतन हवे या मागणीसाठी अंगणवाडी सेविकांचा कडेगांवात मोर्चा

 

 

 

महाराष्ट्र/सांगली /कडेगांव न्युज.

महाराष्ट्र राज्यात गेल्या४डिसेंबर पासून अंगणवाडी सेवकाचा बेमुदत संप सुरु आहे .बेमुदत संपाला एक महिना पुर्ण होवून गेला आहे तरीही शासनाने या अंगणवाडीसेवकाची साधी दखलही घेतली नाही.”आम्हाला मानधन नको वेतन हवे “या घोषणाचा निनाद मोर्चा व ठिय्या आंदोलनात घुमत होता. यासाठी महाराष्ट्र राज्य
अंगणवाडी कृती समिती यांचे वतीने कडेगाव तालुका अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी सेविका यांनी मोर्चा काढला होता
कडेगाव पंचायत समिती समोर मुख्य दरवाजा बाहेर ठिय्या आंदोलन केले.
प्रमुख मागण्या – १)अंगणवाडी सेविका यांना शासकिय कर्मचारींचाच दर्जा द्यावा
२ ) ग्रज्युयटी सेवानिवृतीवेळी देणेत यावी
३) दरमहा पेंशन देणेत यावी
४) जोपर्यत शासन शासकिय कर्मचाऱ्याचा दर्जा देत नाही तो पर्यन्त भरीव मानधन वाढ द्यावी, दरमहा अंगणवाडी सेविकेला सव्वीस हजार व मदतनीस ला वीस हजार रूपये मानधन वाढ द्यावी
आज मोर्चा मध्ये सांगली जिल्हा युनियन पदाधिकारी ,व कडेगाव तालुका युनियन पदाधिकारी अलका माने, अरुणा झगडे, अलका विभुते, नादिरा नदाफ, विजया जाधव, राणी जाधव, शालन जावीर, शुभांगी देशमुख तसेच तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.