सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कराड तालुका अध्यक्षपदी जितेंद्र डुबल उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी केला सत्कार.

Google search engine
Google search engine

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कराड तालुका अध्यक्षपदी जितेंद्र डुबल
उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी केला सत्कार
सातारा/कराड न्युज:

 

 

 

 


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कराड तालुका अध्यक्षपदी करवडी (ता. कराड) गावचे सुपुत्र जितेंद्र हिंदूराव डुबल यांची निवड करण्यात आली. सातारा येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ही निवड झाली. याबद्दल जितेंद्र डुबल यांचा बारामती येथील कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. जितेंद्र डुबल यांच्या रूपाने स्वच्छ प्रतिमा, उत्तम वकृत्व, संघटन कौशल्य आणि तालुक्याच्या कानाकोपऱ्यात सामाजिक कार्यात पूर्णवेळ सततचा वावर अशी वेगळी प्रतिमा असणारा चेहरा पक्षाला मिळाला आहे. सातरा
जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षाच्या तालुका अध्यक्ष निवडीसाठी जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक – निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यामध्ये उपमुख्यमंत्री ना. अजितदादांच्या आदेशाप्रमाणे व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सूचनेनुसार निवडी करण्यात आल्या. यामध्ये जितेंद्र डुबल यांची कराड तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
यावेळी सातारा जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष अमित कदम, सरचिटणीस निवासराव शिंदे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. जितेंद्र डुबल यांनी विद्यार्थीदशेत एनएसयूआयचे जिल्हा अध्यक्ष म्हणून काम केले. युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष, जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक व रयत शिक्षण संस्थेत त्यांनी काम केले आहे. त्यांचा 30 ते 35 वर्षे सार्वजनिक जीवनात वावर आहे. 1985 पासून स्थानिक स्वराज्य संस्था व सहकारी संस्थांच्या निवडणुकात त्यांनी सहभाग घेतला तालुक्यातील सहकारी बँका, बाजार समिती, जिल्हा परिषद व पंचायत समिती, कृष्णा व सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीत वावर राहिला आहे. माजी मंत्री यशवंतराव मोहिते, विलासराव पाटील – उंडाळकर, माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर सुरुवातीच्या काळात आणि अलिकडे दहा वर्षे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार व जयंत पाटील यांच्याशी थेट संवाद होता. परंतु पक्ष फुटीनंत र त्यांनी विधानसभेचे माजी सभापती रामराजे नाईक – निंबाळकर व आ. मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला.
त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचे ठरवले. त्यांच्या कार्याची दखल घेत तालुका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. अजितदादांनी जितेंद्र डुबल यांच्या रूपाने यशवंतराव चव्हाण व पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराड तालुक्यात अत्यंत पारदर्शक व स्वच्छ प्रतिमा असलेल्या चेहऱ्याची निवड केली. त्यांच्याकडे उत्तम वकृत्व, संघटन कौशल्य, तालुक्याच्या कानाकोपऱ्यात सामाजिक कार्यात पूर्णवेळ सतत वावर असल्याने त्याचा पक्ष वाढीसाठी फायदा होईल. याबद्दल जितेंद्र डुबल यांचे विधानसभेचे माजी सभापती रामराजे नाईक – निंबाळकर, आ. मकरंद पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.