*आंतरशालेय विज्ञान प्रदर्शनीत एफ. एम.काशेलानी स्कुलच्या विद्यार्थ्यांनी पटकावला प्रथम क्रमांक

0
193
Google search engine
Google search engine

*आंतरशालेय विज्ञान प्रदर्शनीत एफ एम काशेलानी स्कुलच्या विद्यार्थ्यांनी पटकावला प्रथम क्रमांक*
शेगांव:- स्थानिक शेगांव येथील श्री संत गजानन महाराज इंग्लिश स्कूलने आंतरशालेय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन केले होते. या प्रदर्शनीमध्ये एफ एम काशेलानी स्कुलच्या एकुण तिन संघांनी सहभाग घेतला. चंद्रयान-३, वेगवेगळ्या स्त्रोतांपासून विद्युतनिर्मिती, प्रदुषित पाणी शुद्धीकरण या विषयांशी निगडीत प्रोजेक्ट्स मुलांनी बनविले होते‌. यांपैकी वेगवेगळ्या स्त्रोतांपासून विद्युतनिर्मिती या प्रोजेक्टला तब्बल १६ प्रोजेक्ट्सपैकी प्रथम क्रमांक मिळला. वर्ग ८वीच्या विद्यार्थीनी श्रुती प्रमोद वाकडे, स्नेहल गजानन कापसे आणि रश्मी गौतम इंगळे यांनी मिळून हा प्रोजेक्ट बनविला होता. शिक्षिका प्रणाली शेगोकार मॅडम, तबस्सुम भिमानी मॅडम, शिक्षक अहमद खान सर, सागर सोळंके सर यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी सदर प्रोजेक्ट तयार केले.।शाळेमध्ये या सर्व विजेत्या व सहभागी विद्यार्थीनींचा शाळेचे अध्यक्ष श्री मनोज काशेलानी सर, संचालक तथा मुख्याध्यापक श्री कुणाल काशेलानी सर तसेच सहसंचालक शुभम देशमुख सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
विज्ञानाला अधिक चालना देऊन जिल्हा व राज्यस्तरावर आपले विद्यार्थी जायला हवेत त्यासाठी व्यवस्थापकीय स्तरावरून प्रत्येक वेळी तुमच्या सोबत असू असे आश्वासन देत श्री. मनोज सरांनी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. बालवयात विद्यार्थ्यांनी केलेला पाठ्यपुस्तकांचा व्यवस्थित अभ्यास हा पुढच्या यशाला सोपं करतो, त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपला नियमित पाठ्यक्रम नियमित समजून शिकावा असे आवाहन शुभम देशमुख सरांनी आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांना केले व विजेत्या व सहभागी विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन केले.