हिंदीभाषाचे महत्व अनन्यसाधारण आहे. प्रा. सौ. वैशालीताई मोहीते

Google search engine
Google search engine

हिंदीभाषाचे महत्व अनन्यसाधारण आहे. प्रा. सौ. वैशालीताई मोहीत

 

 

भारत देशाची राष्ट्रभाषा हिंदी हीच आहे. ती आज जगामध्ये तीन नंबरची भाषा मानली जाते. समजण्याच्या बाबतीत इंग्रजीपेक्षा हिंदी निश्चित पुढे आहे. हिंदी भाषेत एक प्रकारचा गोडवा माधुर्य आहे. या भाषेमध्ये अनेक तुलसी, सूरदास, मीराबाई, कबीर, गीतांजली श्री आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मोठे साहित्यिक आहेत. हिंदी भाषा आज अनेक लोकांना रोजगार देणारी भाषा बनली आहे. चित्रपट पटकथा लेखन संवाद लेखन, गीत लेखन, मालिकांसाठी लेखन, जाहिरातीसाठी लेखन आणि अनुवाद या अनेक ठिकाणी हिंदीचे महत्व अनन्यसाधारण साधारण आहे हे निश्चित”, असे प्रतिपादन मा.प्रा.सौ.वैशाली मोहिते यांनी केले.

येथील सौ.शोभाकाकी बाबर कन्या महाविद्यालयामध्ये हिंदी विभागाद्वारे आयोजित ‘विश्व हिंदी दिन’ या कार्यक्रमात मा.प्रा. वैशाली मोहिते या प्रमुख वक्ते म्हणून बोलत होत्या.
त्या पुढे असेही म्हणाल्या की, “हिंदी भाषा एक विकसनशील भाषा आहे. सर्व देशवाशीयांना एकत्र जोडण्याचे काम हिंदी भाषा करते. सर्वांना एकत्र बांधून ठेवते. भारत देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी आपल्या भाषणातून आपल्या राष्ट्रभाषेचा वापर अभिमानाने करतात. आपल्या राष्ट्रभाषेचा वापर आणि प्रचार -प्रसार सर्व भारतीयांनी करावा”.
अध्यक्षीय मनोगतामध्ये महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. किरण यादव म्हणाले की, “हिंदी भाषेमध्ये रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. हिंदी चित्रपटांमुळे अनेक कोटींची आर्थिक उलाढाल होत असते. मार्केटिंग सारख्या क्षेत्रात हिंदीतील अनुवादाला अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झाले आहे. स्पर्धा परीक्षेसाठीही हिंदी भाषेचा पर्याय स्वीकारलेला आहे, यावरून हिंदी भाषेचे महत्व अधोरेखित होते. “हिंदी विभागाद्वारे ‘ज्ञानोत्कर्ष’ या भितीपत्रिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शाल, पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी विभाग प्रमुख प्रा.डॉ. लीला भिंगारदिवे यांनी केले. यावेळी सोनाली कांबळे, सोनाली सूर्यवंशी आणि धनश्री पवार या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.रूपाली यादव यांनी केले. सूत्रसंचालन सानिका शहा हिने केले. या कार्यक्रमास विद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. अत्यंत उत्साहात विश्व हिंदी दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला.