नवनिर्वाचित अध्यक्ष व इतर पत्रकारांचा सन्मान…!

0
72
Google search engine
Google search engine

पत्रकार म्हणजे लोक शाहीचा चौथा स्तंभ नाही तर लोकशाहीचा कणा – नंदाताई पाऊलझगडे

शेगांव:– स्थानिक विश्राम गृह शेगाव येथे लक्षवेध संघटनेची बैठक संपन्न झाली खास पत्रकार दिनाचे औचित्य साधून ह्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते , सामाजिक काम करत असताना लोकशाहीला मजबूत करण्यासाठी पत्रकार कायम लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून काम करत असतात परंतु आजची राजकीय सामाजिक परिस्थिती बघता जे खेळी मेळीचे वातावरण निर्माण होत आहे त्या मध्ये सर्वसामान्य माणसाला हक्क आणि त्यांचा अवाज उचलण्याचे काम कायम पत्रकार आपल्या लेखिनीच्या माध्यमातून पुढे घेऊन जात असतात त्यामुळे आज लोकशाहीचा कणा पत्रकार आहेत. लक्षवेध संघटनेच्या संस्थापिका सौ नंदाताई पाऊलझगडे यांनी आजच्या बैठकीत बोलताना आपले मत मांडले शेगाव प्रेस क्लबचे अध्यक्ष महेंद्र मिश्रा सचिव श्रीकांत कलोरे तसेच प्रेस क्लब शेगावचे अध्यक्ष व खामगाव “दर्पण पुरस्कार प्राप्त” दिनेश महाजन, सचिव सतीश अग्रवाल आणि व्हॉईस ऑफ इंडियाचे तालुकाध्यक्ष नानाराव पाटील सचिव समीर देशमुख
नंदू कुलकर्णी, देवानंद उमाळे, राजवर्धन शेगावकर, अनिल उंबरकर, राजेश चौधरी, अमर बोरसे, राजकुमार व्यास, रामेश्वर गायकी, नारायण दाभाडे, संजय ठाकूर, प्रशांत खत्री, फाईम देशमुख, संजय त्रिवेदी, या सर्व सदस्या पत्रकारांचा सन्मान करीत त्यांना भेटवस्तू दिल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत आपले कार्य असेच चालत राहावे.
व त्यातून जनतेला न्याय मिळावे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल अवताडे यांनी केले