पंतप्रधानाच्या हस्ते हर घर जल योजनेचे ऑनलाइन पद्धतीने उद्घाटन संपन्न..!

0
70
Google search engine
Google search engine

शेगाव:- दिनांक १९ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावर होते या दरम्यान त्यांनी सोलापूर येथून ऑनलाइन पद्धतीने विविध योजनांचे उद्घाटन केले यामध्ये शेगाव नगरपरिषद चा सुद्धा समावेश होता जळगाव जामोद मतदारसंघाचे कर्मयोद्ध म्हणून ओळखले जाणारे आमदार संजय कुटे यांच्या अथक प्रयत्नातून शेगावला 24 तास पाणी मिळावे या उद्देशाने आमदार संजय कुटे यांनी केलेल्या प्रयत्नाचे साफल्य म्हणून पंतप्रधानाच्या हर घर जल या योजनेत च्या निधीमधून 165 कोटी रुपयांचा दुसरा टप्पा जळगाव जामोद मतदार संघाच्या आमदारांनी आणला 2016 च्या पूर्वी शेगाव मध्ये जवळजवळ दहा ते बारा दिवसांनी शेगावला पाणीपुरवठा होत होता त्यावेळी देखील आमदार संजय कुटे यांच्या प्रयत्नातून वान नदीवर असलेल्या हनुमान सागर येथून शेगावला पाणीपुरवठा योजनेमधून पाईपलाईन आणण्याचे काम सुद्धा आमदार संजय कुटे यांनी केले त्यामुळे शेगावला दर दुसऱ्या दिवशी पाणीपुरवठा व्हायला सुरुवात झाली होती आता दुसरा टप्पा म्हणून 165 कोटी रुपयांचा निधी पंतप्रधानांच्या महत्त्वकांक्षी योजनेतून आमदार संजय कुटे यांनी मिळविला या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी भारतिय जनता पक्षाच्या गणमान्य कार्यकर्त्यांसमवेत जिल्ह्याचे खासदार तसेच इतर आमदार उपस्थित होते यासोबतच जिल्हाधिकारी, शेगावचे तहसीलदार, नगरपरिषद मुख्याधिकारी व शहरातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींची उपस्थिती होती हा कार्यक्रमाला नगरपरिषद च्या डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी या सभागृहात सकाळी अकरा वाजता पार पडला. यामुळे शेगाव वासियांना आता 24 तास पाणी मिळेल.