धक्कादायक – उपोषण चालू असलेल्या मंडपात उपोषण कर्त्याने घेतला गळफास

0
6787
Google search engine
Google search engine

वरुड :-  बेनोडा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या शिंगोरी या गावापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या बर्डी या ठिकाणापासून अप्पर वर्धा धरणाच्या बॅक वॉटर पात्रात जुनी सुरवाडी, भुताबर्डी या ठिकाणी अप्पर वर्धा धरणग्रस्तांचे आंदोलन काही दिवसांपासून सुरु आहे अश्यातच काल  शुक्रवारी रात्री उपोषण मंडपात एका उपोषण कर्त्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे

सुसाईड नोट

गोपाल दहीवडे यांनी आत्महत्या केली असून आपल्या आत्महत्येला शासन प्रशासन जवाबदार असल्याचे त्यांनी लिहून ठेवले आहे सध्या या ठिकाणी तणावाची परिस्थिती असून हा लढा असाच सुरुच ठेवावा असेही गोपाल यांनी लिहून ठेवले आहे. घटनास्थळावर पोलीस पोहचले असून पुढील तपस सुरु केला आहे