उत्कृष्ट सेवकांचा शिवणी ग्रामपंचायतीच्या वतीने नागरी सत्कार!!*

Google search engine
Google search engine

*उत्कृष्ट सेवकांचा शिवणी ग्रामपंचायतीच्या वतीने नागरी सत्कार!!
सांगली/कडेगांव न्युज:

 

 

 

कडेगाव तालुक्यातील शिवणी येथे प्रजासत्ताक दिनी गावातील विविध संस्थेत उत्कृष्ट सेवा बजावणारे शिक्षक, मुख्याध्यापक ,कर्मचारी यांचा ग्रामपंचायत शिवणी यांचे वतीने नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये श्री म्हाळसाकांत विद्यालय शिवणीचे मुख्याध्यापक श्री. पी . टी. पवार सर यांचा शैक्षणिक उठावातून भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल आदर्श मुख्याध्यापक म्हणून गौरव करण्यात आला. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवणीचे उपक्रमशील शिक्षक श्री. तानाजी देशमुख यांचा डॉ. पतंगराव कदम गुणवत्ता शिष्यवृत्तीत जिल्हा गुणवत्ता यादीत 2 विद्यार्थी पात्र ठरले, त्यांना मार्गदर्शन ,तसेच विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवल्याबद्दल “उपक्रमशील शिक्षक “म्हणून गौरव करण्यात आला.
शिवणी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक श्री. शिर्के एस .ए.यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मिळाल्याबद्दल तर म्हाळसाकांत विद्यालय शिवणीचे क्लार्क श्री .एम .बी .देशमुख यांना उत्कृष्ट लेखनिक म्हणून सन्मानित करण्यात आले. म्हाळसाकांत विद्यालयाच्या उपशिक्षिका सौ .येवले आर. एस. नेट परीक्षा उत्तीर्ण, भारती विद्यापीठ कडेगाव च्या सहाय्यक प्राध्यापिका सुवर्णा सागर पवार यांचा सेट परीक्षा उत्तीर्ण, राजाराम कॉलेज, कोल्हापूर .येथील प्राध्यापिका क्षितिजा परशुराम पवार सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल त्याचप्रमाणे मेडिकल सोशल सुप्रीडंट या पोस्टवर निवड झाल्याबद्दल कुमारी स्नेहल सूर्यकांत पवार या सर्वांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी श्री विष्णू सिताराम पवार ( गुरुजी) यांनी संस्थेच्या भविष्यातील नियोजनासाठी खंडोबा मंदिर ट्रस्ट, म्हाळसाकांत विद्यालय, शिवणी. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिवणी. यांना रोख स्वरूपात देणगी देण्यात आली.
शिवणी ग्राम पंचायतीच्या या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमासाठी गावचे सरपंच मा. संदीप पवार, सदस्य दत्तात्रय चव्हाण (महाराज) , सौ .विजया पवार, सौ मनीषा माने, सौ. वृषाली महाडिक, चेअरमन संतोष जाधव, धैर्यशील पवार, दौलतराव माने, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय साहेबराव पवार, विद्यालयातील शिक्षक दिलीप कचरे, शरीफ मुल्ला ,गणेश पवार, रवींद्र पुणेकर ,रूपाली लाकुळे , रजनी मोहिते, समृद्धी लाड, सर्व विद्यार्थी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.