शेगावचा शोध पत्रकारिता पुरस्काराने नानाराव पाटील सन्मानित…!

0
188
Google search engine
Google search engine

व्हाईस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष नाना पाटील शोध पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित
शेगाव— शेगाव पत्रकार संघ यांच्या वतीने आयोजित पत्रकार दिन निमित्त पत्रकार दिन सोहळ्यात तरुण भारतचे शहर प्रतिनिधी तथा वाईस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष नानाराव पाटील यांना शोध पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
दिनांक 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या उचित सादर शेगाव पत्रकार संघाच्या वतीने गांधी चौक येथे संध्याकाळी सात वाजता पत्रकार दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये इंजिनियर पवनपाल महाराजची वादळ वाणी तसेच जीवनगौरव पुरस्कार व शोध पत्रकारिता पुरस्कार देण्यात आले यावेळी मंचकावर महा . पणन महासंघाचे संचालक प्रसन्नजीत पाटील,सहकार नेते विजयबाप्पू देशमुख, माजी नगराध्यक्ष शरदसेठ अग्रवाल,माजी नगराध्यक्ष सौ शकुंतलाताई बुच, माजी जि.प उपाध्यक्ष संगीतराव भोंगळ पाटील,समाजभूषण नितीन शेगोकर, निर्भया फाऊंडेशन अध्यक्षा कल्पनाताई मसने, माजी नगरसेविका प्रितीताई शेगोकर, रा काँ महिला प्रदेश उपाध्यक्ष हास्य कवी सम्राट नितीन वरणकार, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त हभप ज्ञानेश्वरजी मिरगे सर, शिवसेना तालुकाप्रमुख रामा थारकर पाटील, भाजपा अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष महेबुब ठेकेदार, मातृभूमी तालुका प्रतिनिधी देवानंद उमाळे, ज्येष्ट पत्रकार विजय जोशी, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संजय गव्हांदे,राजु पाटील शेगोकार,शेगाव ग्रामीण ठाणेदार दिलीप वडगांवकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती..
नानाराव पाटील हे जिल्ह्यातील पहिला राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक स्वर्गीय वा.ओ. पाटील यांचे सुपुत्र असून ते गत १३वर्षा पासून पत्रकारित क्षेत्रात काम करीत असून त्यांची आतापर्यंत अनेक संघटने विविध पदी भूषण दिली आहे ते सर्व स्तरावर आपल्या लेखणीच्या माध्यमातून प्रहार करीत अनेक समस्या निकाली काढल्या महत्त्वपूर्ण शोध पत्रकारिता हा त्यांचा छंद असून शोध बातम्या करून त्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचण्याचे काम ते करत आहे. त्यांच्या अनेक शोध पत्रकारितेच्या बातम्या प्रसिद्धी झालेला आहे त्या अनुषंगाने शेगाव पत्रकार संघाच्या वतीने त्यांना शोध पत्रकारिता पुरस्कार देण्यात आला त्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सावली सेवा प्रकल्पाचे प्रशांत कराळे सर तर आभार शेगाव पत्रकार संघाचे अध्यक्ष दिनेश महाजन यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पत्रकार सतीष अग्रवाल, रवी शेगोकार, ज्येष्ट पत्रकार राजवर्धन शेगावकर,अमर बोरसे,शेगाव प्रेस क्लब अध्यक्ष बालू मिश्रा,उमेश शिरसाट,नितीन घरडे, ज्ञानेश्वर ताकोते,ललित देवपुजारी, शेख अमीन,देवचंद्र सम्दुर, पंडीत परघरमोर, गजानन कुळकर्णी, समीर देशमुख, रोहित देशमुख, सुभाष वाकोडे,ऋषिकेश देठे,सौरभ स्वामी आदींनी परिश्रम घेतले.