भारतीय महाविद्यालयात दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

0
383
Google search engine
Google search engine

 

अमरावती प्रतिनिधी :
स्थानिक भारतीय महाविद्यालय,अमरावती येथे दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. वार्षिक स्नेहसंमेलनाचे उदघाटन प्राचार्य डॉ आराधना वैद्य यांच्या हस्ते झाले. या संमेलनामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना व कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात अनेक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले. यामध्ये विविध कलागुणांना वाव देणाऱ्या स्पर्धा घेण्यात आल्या.


वार्षिक स्नेहसंमेलन बक्षिस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ सतीश कुळकर्णी,अध्यक्ष,भारतीय विद्या मंदिर,अमरावती.प्रमुख उपस्थिती डॉ.आराधना वैद्य प्राचार्य,भारतीय महाविद्यालय,अमरावती,सांस्कृतिक समिती प्रा.डॉ. सुमेध आहाटे, प्रा.डॉ. विक्रांत वानखडे, प्रा.डॉ.डी.एस.कुळकर्णी,प्रा.डॉ.अनिल खांडेकर,प्रा.डॉ.बि.एस.चिंचमलातपुरे, प्रा.डॉ.संगिता देशमुख,प्रा.पंडीत काळे व्यापिठावर उपस्थित होते.
वार्षिक संमेलनामध्ये मेहंदी स्पर्धा, रांगोळी स्पर्धा,समयी स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा, निबंध स्पर्धा, फॅशन शो स्पर्धा, गीत गायन स्पर्धा, नृत्य स्पर्धा, बटाटा रेस स्पर्धा, नींबू चमचा स्पर्धा, तसेच विविध क्रीडा स्पर्धा, त्याचप्रमाणे क्रीडा विभागाच्या वतीने सन २०२३ -२४ मध्ये महाविद्यालयीन स्तरावर व विद्यापीठ स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. तसेच करण यादव व प्रदीप यादव या दोन्ही कुस्ती पटूंनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाला सुवर्णपदक प्राप्त करून दिले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांतील 24 क्रीडा प्रकारात सहभाग नोंदविला. त्यामध्ये अकरा खेळाडूंची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विविध संघांमध्ये निवड झाली या सर्व खेळाडूंना वार्षिक स्नेह संमेलनात सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.


संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ,अमरावती विद्यापिठात एम.ए. भाग -१ चा विद्यार्थी अजय कुडवे यांची संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या सॉफ्ट बॉल स्पर्धेसाठी जम्मू मध्ये निवड झाली. तसेच ऋत्विक कुडवे एम.ए.भाग -१ व तिलक पवार एम.ए. भाग -२ या विद्यार्थ्यांची सुद्धा सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी निवड, तसेच सॉफ्टबॉल संघाची कप्तान साक्षी शिंदे एम.ए.भाग -२ स्पर्धेसाठी निवड, रिया टोणपे बी.कॉम.भाग – ३ या स्पर्धेसाठी,सार्थक आजवेड बी.कॉम.भाग – ३ वरील सर्व विद्यार्थ्यांची स.गा.बा. अमरावती विद्यापीठाच्या स्पर्धेमध्ये टेनिस संघ, सॉफ्ट बॉल,कुस्ती मध्ये निवड झाली आहे. त्यांचा स्नेह संमेलनात मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

त्याचप्रमाणे वार्षिक स्नेह संमेलन स्पर्धा त्यात कॅरम स्पर्धेमध्ये विपुल कराळे व ओम सैरीसे, चेस्ट स्पर्धेमध्ये निलेश पैठणकर व वरद जोशी, क्रिकेटमध्ये सार्थक देशमुख व मयुरेश कुलकर्णी,बटाटा रेस मध्ये राम राठोड प्रथम तर साक्षी शिंदे द्वितीय, लिंबू चमचा स्पर्धेमध्ये अजय दाते प्रथम तर मोहिनी कनोजिया द्वितीय, नॉन टीचिंग स्टाफ मधून चमचा स्पर्धेमध्ये सुनिता ढगे प्रथम तर नेहा हरले द्वितीय,मेहंदी स्पर्धेमध्ये गौरी कुरे प्रथम, साक्षी कराळे द्वितीय,रांगोळी स्पर्धेमध्ये दिपाली यावले प्रथम,साक्षी कराळे द्वितीय ,समयी स्पर्धेमध्ये प्रगती शिगणे प्रथम तर तनवी गावंडे द्वितीय, प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये सुश्मिता यादव प्रथम, दिव्यांनी राऊत द्वितीय, निबंध स्पर्धा हिंदी विभागातून तेजस्विनी वर्हेकर प्रथम, भावेश भारती द्वितीय, निबंध स्पर्धा मराठी विभागामधून प्रिया प्रघने प्रथम, तेजस्विनी वर्हेकर द्वितीय. इंग्रजी निबंध स्पर्धा आकांक्षा ढोके प्रथम, अनघा काटोलकर द्वितीय ,फॅशन शो स्पर्धा कुमारी रिता कांबळे प्रथम,रिचा पांडे द्वितीय, गीत गायन स्पर्धेमधून कु. कल्याणी कराळे प्रथम,सोनल आथोटे द्वितीय,नृत्य स्पर्धा आकांक्षा बुटले प्रथम,सोनल आथोटे द्वितीय,समूह नृत्य स्पर्धेमध्ये रुचिता खोब्रागडे, उर्मिला बेटेकर, मेघा रंगारी प्रथम, द्वितीय क्रमांक सुजल बनसोड व भाविका शिरभाते यांनी पारितोषिके प्राप्त केले. बटाटा रेस स्पर्धेमध्ये प्राध्यापकामधून डॉ. प्रशांत विघे प्रथम,प्रा. भारती भडके द्वितीय,क्रिकेट स्पर्धेमध्ये डॉ.संग्राम रघुवंशी याच्या नेतृत्वात प्राध्यापक संघ विजयी झाला.


वार्षिक स्नेहसंमेलन पारितोषिक वितरण याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणाले कि, प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये कला गुण असतात.या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजाभीमूख कार्यक्रम राबविणे गरजेचे असते. विद्यार्थ्यानी कला-गुणासोबतच शैक्षणिक आलेख उंचावेल या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करणे गरजेचे आहे.पुढे प्राचार्य डॉ. आराधना वैद्य म्हणाल्या कि, स्नेहसंमेलन हे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी महत्वाचे आहे. भौतिक विकासाबरोबर‎ शारीरिक सामाजिक सांस्कृतिक‎ असा सर्वांगीण विकास होणे‎ महत्त्वाचे असते त्यामुळे विद्यार्थ्यांचे‎ जीवन स्वच्छंदी बनत असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तन्वी गावंडे आणि पायल जवंजाळ हिने केले. आभार डॉ. विक्रांत वानखडे मानले.वार्षिक स्नेहसंमेलन यशस्वी कार्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक,शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी,रा.से.यो., NNC च्या विद्यार्थ्यांनी यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.