अमरावती जिल्हा ब्रेकिंग :- स्कुल बस आणि सिमेंट मिक्सर ट्रकचा भीषण अपघात – ४ तरुणांचा मृत्यू ; १० जखमी

0
7547
Google search engine
Google search engine

अमरावती वरून यवतमाळला क्रिकेट मॅच खेळण्यासाठी जाणा-या युवकांच्या सकाळी ७.३० च्या सुमारास झालेल्या या अपघातात ४ तरुणांचा मृत्यू झाला तर १० जण गंभीर जखमी झाले आहे. गंभीर झालेल्यांना अमरावती येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

अमरावती जिल्ह्याच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिंगणापूर जवळ सिमेंट काँक्रिट मिक्सर आणि स्कुल बसमध्ये झालेल्या भीषण अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला तर १० जण जखमी झाले आहेत.. यवतमाळ येथे क्रिकेट मॅच खेळण्यासाठी हे १४ तरुण अमरावतीहून यवतमाळसाठी सकाळी निघाले होते. मात्र वाटेतच नांदगाव खंडेश्वरच्या शिंगणापूरजवळ हा भीषण अपघात झाला.

हे ठीकाण अपघाता साठी ब्लॅक स्पाॅट असुन आता पर्यंत अनेक जणांचा येथे अपघातात बळी गेला आहे तरीही शासना कडून काहीही खबरदारी घेतल्या जात नाही म्हणून नागरीकात रोष आहे.