बुलढाणा जिल्ह्यात गाजत आहे अपक्ष उमेदवार संदीप शेळके यांच्या सभा

0
150
Google search engine
Google search engine

बुलढाणा जिल्ह्यात गाजत आहे अपक्ष उमेदवार संदीप शेळके यांच्या सभा.                                            शेगांव :- येत्या काही दिवसांमध्येच लोकसभेचा कार्यकाळ हा संपणारा आहे लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचा मुद्दा गाजणार असुन त्या अनुषंगानेच बुलढाणा जिल्ह्यामध्ये अनेक शेतकरी नेत्यांचे आंदोलने सुरू असून हे नेते लोकसभेमध्ये आपलं वर्चस्व दाखवत आहेत या उलट लोकसभेचे अपक्ष उमेदवार म्हणून स्वयंघोषित संदीप शेळके यांनी मागील आठ ते नऊ महिन्यापासूनच संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोकांशी जनसंवाद करत जनसंवाद यात्रा सुरू केलेली आहे काल ही जनसंवाद यात्रा शेगाव तालुक्यामध्ये फिरत असताना त्यांच्या भाषणांमुळे अनेक युवा वर्ग आणि शेतकरी त्यांच्याकडे आकर्षित होताना दिसत आहेत शिवाय शेतकऱ्यांच्या प्रश्न नंतर युवा वर्गालाही सुद्धा हाताला काम हवे आणि जिल्ह्याचा मागासलेपणा दूर व्हावा नव्हे तर आम्ही मागासलेले नाही आहोत परंतु आतापर्यंतच्या सर्व नेत्यांनी काही कामेच केली नाहीत असा आरोप लावीत त्यांच्या सर्व सभा चांगल्याच गाजत असून युवा वर्ग सुद्धा त्यांच्याकडे आकर्षित होताना दिसत आहे यामुळे आता बुलढाणा जिल्ह्यातील जे शेतकरी नेते आहेत त्यांचे धाबे दणाणले आहेत तर प्रसार माध्यमांसोबत बोलताना मला मतदार राजाने संधी द्यावी मी जिल्ह्याचा च मागासलेपणा हा कलंक पुसून बुलढाणा जिल्ह्याला अग्रस्थान मिळण्याचे वचन देतो अशी त्यांनी हमी भरली.