मुख्यमंत्री स्वच्छ सुंदर शाळा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालय कडेगाव तालुक्यात प्रथम*

Google search engine
Google search engine

*मुख्यमंत्री स्वच्छ सुंदर शाळा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालय कडेगाव तालुक्यात प्रथम
.

 

 

नंसांगली/कडेगांव न्युज:

भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजने अंतर्गत .मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्यात आले यामध्ये रयत शिक्षण संस्थेचे महात्मा गांधी विद्यालय व श्रीरंग नामदेव कदम जुनियर कॉलेज कडेगाव या विद्यालयाने कडेगाव तालुक्यात प्रथम क्रमांक पटकवून 3 लाखाचे बक्षीस मिळवले आहे केंद्रस्थरीय, तालुका स्थरीय, जिल्हास्थरीय कमिटीकडून मूल्यांकन करण्यात आले कडेगाव तालुक्यातील उपक्रमशील शाळा व सर्व भौतिक सोयीसुविधानियुक्त विद्यालय म्हणून सर्वपरिचित आहे.
तसेच शालेय स्वछता, शिस्त व गुणवत्ता बोलक्या भिंती, कर्मवीर बचत बँक, परसबाग वृक्षसवर्धन आर्थिक साक्षरता आरोग्य तपासणी, मान्यवरांची व्याख्याने NCC कॅम्प, विज्ञान प्रदर्शन, औषधी वनस्पती बाग फुलपाखरू उद्यान, गांडूळखत निर्मिती प्रकल्प असे विविध उपक्रम राबवण्यात आले आहेत तसेच आय. एस.ओ. मानांकन प्राप्त, कर्मवीर पारितोषिक विजेते,आदर्श शाळा पुरस्कार मिळाले आहेत या उपक्रमाचे मा. शिक्षणाधिकारी,उपशिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी व विविध केंद्रप्रमुख यांनी कौतुक केले
विद्यालयाच्या प्रगतीसाठी विभागीय अधिकारी हनशी साहेब, जनरल बॉडी सदस्य, स्कूल कमिटी सदस्य शाळा व्यवस्थापन समिती व शाळा विकास समिती, शिक्षक पालक संघ,माता पालक संघ, पालक व ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व संस्था पदाधिकारी, पालक व ग्रामस्थ कडेगाव पंचक्रोशी यांनी आदर्श मुख्यद्यापक मा. चव्हाण डी. व्ही. व सर्व शिक्षक- शिक्षकेतर यांचे अभिनंदन केले.