देशमुख इंग्लिश स्कूलमध्ये स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

0
694
Google search engine
Google search engine

शेगाव स्थित लेट बि.एस देशमुख इंग्लिश स्कूल शेगाव मध्ये स्नेहसंमेलन  फ्लाईंग बर्ड २०२४ पार पडले.

शेगांव:- सर्वप्रथम विद्येची आराध्य देवता माता सरस्वती, संत श्री गजानन महाराज, शिवाजी महाराज, यांच्या प्रतिमेचे पूजन करून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून स्व.भाऊराव शिवरामजी देशमुख बहुउद्देशीय संस्था शेगावचे अध्यक्ष मा. श्री विजयबाप्पु देशमुख तर प्रमुख अतिथी म्हणून शेगाव शिक्षण संस्थेचे संचालक श्री. रवी सेठ मुरारका हे होते कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याने झाली या राज्यभिषेकाचे सादरीकरण सर्वच वर्गांच्या विद्यार्थ्यांनी केले डोळ्यांचे पारणे फेडणारा हा क्षण होता. नंतर नर्सरी ते सहव्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी अनेकविध कार्यक्रमात मोठ्या उत्साहाने जोमाने सहभाग घेतला सर्व बहुसंख्येने उपस्थित असलेल्या पाहुण्यांची मने जिंकली स्नेहसंमेलन काटेकोर व नियोजन पूर्वक असल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा हाच उद्देश. कार्यक्रमाचे ध्येय दिसून आले अनुक्रमे पहिल्या कक्षातील विद्यार्थ्यांनी सादर केलेले स्त्रीभ्रूण हत्याविरोधी नाट्य सर्वांना समजून देत होती तर २६/११/ २०१८ मध्ये झालेल्या मुंबई बॉम्बस्फोटाची हूबेहूब कलाकृती सर्वांच्या मनाला व हृदयाला भिडणारे सादरीकरण झाले तर प्रत्येकाला काहीतरी बोध घ्यावा शिकावं अशाच प्रकारचा उत्कृष्ट प्रदर्शन या चिमुकल्यांनी सादरीकरण केले त्यामध्ये वर्षभरामध्ये शाळेचा आरसा म्हणजे वार्षिक अहवाल सादर करण्यात आला यामध्ये कशा अनेक विविध प्रकारच्या ऍक्टिव्हिटी कशा नियोजनबद्ध घेऊन विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव दिला जातो हे प्रियंका देशमुख मॅडम यांनी सांगितले. रिदमिक जिम्नॅस्टिक,स्वतंत्र मार्गदर्शक, क्रीडा सप्ताह मध्ये अनेक विविध खेळ आयोजित केले होते त्यामध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते बक्षीस वितरण प्रमाणपत्र देऊन करण्यात आले. क्रीडा सप्ताहामध्ये उंच उडी, धावण्याची शर्यत, लिंबू चमचा इत्यादी खेळांचे आयोजन करण्यात आले उत्कृष्ट संचालन प्रियंका देशमुख व प्रीती अंभोरे या शिक्षिकानी केले तर आभार प्रदर्शन शिक्षिका सौ.कस्तुरे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वी साठी सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. यावेळी विद्यार्थ्यांचे पालक परिसरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.