अल्पसंख्यांक आयोगाच्या अध्यक्ष पदी शाहरुख मुलाणी यांची नियुक्ती करावी – इसाक खडके

0
1182
Google search engine
Google search engine

मुंबई. ( विशेष प्रतिनिधी )  –

 

महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाच्या अध्यक्ष पदी ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे महाराष्ट्र राज्य सचिव शाहरुख मुलाणी यांची नियुक्ती करावी असे महाराष्ट्र राज्य मुस्लिम खाटीक समाजाचे चिटणीस इसाक खडके यांनी सांगितले आहे.

खडके म्हणाले की, गेली अनेक वर्षांपासून महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष तथा इतर संविधानिक पदे रिक्त आहेत. त्यामुळे अल्पसंख्यांक समाजाचे अनेक प्रकरणे या कार्यालयात सुनावणी करण्यासाठी प्रलंबित पडले आहे. त्यामुळे अल्पसंख्यांक समाजाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच आयोगाचे दौरे बंद झाले आहेत. अल्पसंख्याक लोकसमुहांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व सांस्कृतिक अशा सर्वसमावेशक उत्कर्षासाठी तसेच अल्पसंख्याकांच्या हक्काचे संरक्षण करणे. असे या आयोगाचे काम आहे. परंतु गेली दोन वर्षांपासून अध्यक्ष सहित इतर पदे रिक्त असल्याने काम कसे होतील ? अल्पसंख्यांक हे धार्मिक अल्पसंख्याक व भाषिक अल्पसंख्याक असे दोन प्रकारचे आहेत. महाराष्ट्र राज्य शासनाने राज्य अल्पसंख्याक आयोग अधिनियम 2004 मधील कलम 2 (ड) नुसार सहा समुदाय अल्पसंख्याक लोकसमूह घोषित केले आहेत. ते 6 समुदाय म्हणजे मुस्लिम, ख्रिश्चन, शिख, बौध्द, पारशी आणि जैन हे होत. यांना न्याय कसा मिळेल. असा प्रश्न खडके उपस्थित करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी संकल्पनेतील ‘ राष्ट्रीय युवा निर्मिती ’ व्हावी या अनुषंगाने गेली अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात काम करणारे ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या महाराष्ट्र राज्य सचिव शाहरुख मुलाणी यांनी नियुक्ती करावी जेणेकरून अल्पसंख्यांक समाजाचा विकास होईल, त्यांनी असे सांगितले. मुलाणी हे गेली अनेक वर्ष सामाजिक क्षेत्रात काम करत आहे. त्यामुळे राज्यात त्यांचा चांगला जनसंपर्क झालेला आहे. ते महाविद्यालयात असताना ‘ राष्ट्रीय सेवा योजना ’ मध्ये विद्यार्थी प्रतिनिधी होतो. याकाळात त्यांनी हजारो विद्यार्थ्यांसोबत आदिवासी भागात अनेक कार्यक्रम केले आहेत. पुढे ते ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या महाराष्ट्र राज्य सचिव तथा मंत्रालयीन सचिव म्हणून काम पाहत आहे. या संघटनेच्या माध्यमातून ते मुस्लीम समाजातील वक्फ बोर्ड आणि औकाफ च्या प्रश्नासंदर्भात तसेच मुसलमान समाजातील अनेक गंभीर प्रश्नांवर काम करत आहे. तसेच मुलाणी हे बारा अतुलेदार-बलुतेदार पैकी एक असलेल्या मुल्ला-मुलाणी समाजाचे अध्यक्ष आहेत. नक्कीच अल्पसंख्यांक समाजाचा विकास करण्यात शाहरुख मुलाणी हे भरीव योगदान देतील अशा विश्वास आहे असे महाराष्ट्र राज्य मुस्लिम खाटीक समाजाचे चिटणीस इसाक खडके यांनी सांगितले.