ना. पंकजाताई मुंडे यांची मुंबईतील महिला स्वसंरक्षण केंद्राला भेट ; अक्षयकुमार, आदित्य ठाकरे यांचीही उपस्थिती

0
784
Google search engine
Google search engine

अंधेरीतील स्पोर्टस् काॅम्प्लेक्स याठिकाणी अक्षयकुमार व आदित्य ठाकरे हे दोघे संयुक्तपणे वुमन सेल्फ डिफेन्स सेंटर चालवतात.

:नितीन ढाकणे, दिपक गित्ते

दि. १६. सिने अभिनेते अक्षयकुमार आणि युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी सुरू केलेल्या महिला स्वसंरक्षण केंद्राला राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी रविवारी भेट देवून पाहणी केली. शाळकरी मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्याचे काम या केंद्रामार्फत केले जाते.

अंधेरीतील स्पोर्टस् काॅम्प्लेक्स याठिकाणी अक्षयकुमार व आदित्य ठाकरे हे दोघे संयुक्तपणे वुमन सेल्फ डिफेन्स सेंटर चालवतात. महिला व मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा तसेच प्रसंगावधान ओळखून स्वतःचे संरक्षण कसे करावे याचे प्रशिक्षण या केंद्राच्या वतीने दिले जाते. सध्या या केंद्रातून १६ हजार मुली प्रशिक्षण घेत आहेत. ठाणे, सुरत, उदयपूर, बुलढाणा आदी शहरांमध्ये या केंद्राच्या शाखा आहेत.

अक्षयकुमार आणि आदित्य ठाकरे यांच्या खास निमंत्रणावरून ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी काल या केंद्राला भेट देवून तेथील प्रशिक्षणाची पाहणी केली. त्यांना पाहताच तेथील मुली आनंदाने भारावून गेल्या व त्यांचेसोबत फोटोसेशनही केले. राज्यातील मुलींसाठी अशा प्रकारचे प्रशिक्षण देणारा एखादा प्रकल्प सुरू करता येईल का याविषयी ना. पंकजाताई मुंडे यांनी अक्षयकुमार यांच्याशी या भेटीत सविस्तर चर्चा केली.