आम्ही धनगड नाही तर धनगर आहोत

0
832
Google search engine
Google search engine

औरंगाबाद :(केतन कोलते)

सकळ धनगर समाजाचा जाहीर मेळावा हमखास मैदानावर पार पडला. (दि:३१)शुक्रवारी ठीक 5 वाजता या मेळाव्याला सुरूवात झाली. त्यामध्ये विविध जिल्ह्याच्या धनगर समाजाचा समावेश होता. धनगड हा शब्द चुकीचा आहे तो लवकर दुरुस्त करण्यात यावा व इतर मागण्यासह या मेळावा घेण्यात आला.

महाराष्ट्र सरकारने ५ ऑगस्ट पूर्वी धनगड व धनगर याची मिटींग लावावी, १९,५०,००० बोगस आकडेवारी धाखवून लाभ घेतलेल्या आमदार, खाजदार आदिवासींवर गुन्हे दाखल करण्यात यावे, प्रत्येक गावातील धनगड समाजाचे पत्ते द्यावेत , धनगड दाखवा नाहींतर एसटी सर्टिफिकिट पाठवा या प्रमुख मागण्या घेऊन धनगर समाज एकत्र आला होता.या मेळाव्याची सुरुवात ध्वजारोहन व पोवाडा सादर करून करण्यात आली. या मेळाव्याच्या अध्यक्ष स्थानी आमदार गणपतरावजी देशमुख होते. तसेच या मेळाव्याचे प्रमुख नेतृत्व गोपीचंद परालकर व उत्तम जानकर यांनी केले.आम्ही धनगड नाही तर धनगर आहोत याचे पुरावे सादर करत लघुपटाच्या माध्यमातून आपली व्यथा मांडली. पुढे जानकर बोलत असताना म्हणाले की, गेल्या ,७० वर्षापासून धनगर समाज दुःख सोसत आला आहे. माजी मुखमंत्री पुथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळामध्ये धनगर चे धनगड झाले आहे. ८ मार्च २०१५ पासून आम्ही या सुधारणेबाबद सरकारकडे अपील करत आहोत. धनगड ही जात अस्तित्वातच नाही असे पुराव्यासहित आम्ही दाखवुन देऊ, तसेच प्रत्येक धनगर समाजाच्या व्यक्तीने सरकारकडे या बाबद पत्रे पाठवा असे आवाहन उपस्थित धनगर समाजाच्या बांधवाना केले.