प्रत्येक प्रकारच्या मुलांसाठी शाळा होणार सज्ज – जलद गतीने शिक्षण : तालुकास्तरीय माध्यमिक शिक्षक प्रशिक्षण

0
890
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे / शहेजाद खान /-

 

राज्यात दोन वर्षापासून  प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत विविध शैक्षणिक कार्यक्रम राबविल्या जात असून माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांची गळती व स्थगिती रोखण्यासाठी जलद गतीने शिक्षण या अंतर्गत प्रत्येक मुलाच्या अध्ययनावर प्रत्यक्ष भर दिल्या जात आहे.मुलाला शाळेसाठी तयार केल्यापेक्षा प्रत्येक प्रकारच्या मुलांसाठी शाळा सज्ज होणार असल्याचे तज्ञ मार्गदर्शक योगेश वेरुळकर यांनी गटसाधन केंद्र येथे इयत्ता नववी च्या शिक्षकांसाठी घेण्यात आलेल्या जलद गतीने शिक्षण प्रशिक्षण दरम्यान सांगितले. जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेमार्फत दिनांक १ व २ जुलै दरम्यान गटसाधन केंद्र पंचायत समिती चांदूर रेल्वे येथे इयत्ता नववी मधील इंग्रजी ,मराठी गणित व  विज्ञान विषयाच्या शिक्षकांसाठी या प्रशिक्षणाचे आयोजन केले होते.तालुक्यातील २३ शाळांमधील ६५ शिक्षकांनी या मध्ये सहभाग नोंदविला .प्रशिक्षणानंतर  या शिक्षकांना त्यांच्या शाळेवर इ.आर.ए.सी.या तंत्रानुसार मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांना अध्यापन करावयाचे आहे सोबत हे तंत्र आपल्या सहकारी शिक्षकांना अवगत करायचे आहे..माध्यमिक शिक्षणात इंग्रजी ,गणित ,विद्यान या विषयात सर्वाधिक मुले नापास होतात पर्यायाने ते शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर जातात त्यामुळे या विद्यार्थ्यांवर अधिक मेहनत करून यांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी जलद गतीने शिक्षण या अंतर्गत मुलांना अधिक शैक्षणिक बाबींनी सक्षम करावयाचे असल्याचे तज्ञ मार्गदर्शक योगेश वेरुळकर यांनी सांगितले.प्रशिक्षणामध्ये पार्वती दांडगे यांनी मराठी  भाषा ,दिलीप काळे यांनी इंग्रजी भाषा या विषयावर मार्गदर्शन केले. डायट प्राचार्य डॉ रवींद्र अंबेकर ,जेष्ठ अधिव्याखता आर पी खडके,गटशिक्षणाधिकारी अशोक इंगळे यांच्या मार्गदर्शनात श्रीनाथ वानखडे यांनी प्रशिक्षण समन्वयक म्हणून भूमिका निभावली.प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी विषयतज्ञ वर्षा गादे,कल्पना गुडधे,विजय दवाडे ,कैलास सहारे ,मंगेश पवार यांनी परिश्रम घेतले.

 

 

प्रशिक्षणार्थीतर्फे  दोन पंखे भेट 

गटसाधन केंद्रात वर्षभर प्रशिक्षणाची आयोजन केले जाते त्यामुळे सर्वाना दर्जेदार प्रशिक्षणासह दर्जेदार प्रशिक्षण व्यवस्था व्हावी या उद्देशाने प्रशिक्षणार्थी कडून गटसाधन केंद्राला दोन पंखे भेट देण्यात आले.प्रशिक्षणार्थी च्या वतीने ओ एस बोबडे यांनी मुख्याध्यापक कार्यशाळेत गटशिक्षणाधिकारी अशोक इंगळे,विस्तार अधिकारी आबिद हुसैन,दाभाडे,विषयतज्ञ श्रीनाथ वानखडे ,मंगेश उल्हे ,विवेक राऊत आदींच्या उपस्थितीत ही भेटवस्तू देण्यात आली.