नगरपालिका दिवाबत्ती विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष

0
543
Google search engine
Google search engine

अचलपूर / श्री प्रमोद नैकेले /-

 

 

अचलपूर नगरपालिका तशीही नागरीकांना मूलभूत सुवीधा पुरवीण्याबाबत उदासीन आहे आता नगरपालिकेचे विविध विभाग नागरीकांच्या जिवीतावर उठलेले आहेत.
अचलपूर नगरपालिका नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्यात अकार्यक्षम ठरत आहे.अचलपूर परतवाडा जुळ्या शहराच्या संयुक्त नगरपालीकेत अचलपूर हे जुने ऐतिहासिक शहर.हे शहर भौगोलिक दृष्ट्या,लोकसंख्येच्या बाबतीत मोठे शहर या शहरातून नगरपालिकेला उत्पन्न जास्त असतांना सुध्दा विकास व सुविधांचे बाबतीत हे शहर नेहमीच मागे राहिले आहे.या शहरात आजही सुरक्षित चालण्यायोग्य रस्ते नाहीत वाढत्या रहदारी मुळे प्रत्येक रस्त्यावर नेहमीच जाम पाहायला मिळतो.रस्त्याने अबालवृध्दांना सुरक्षित चालण्याची सुविधा नाही.पिण्याचे स्वच्छ व मुबलक पाणी नाही.आरोग्य दृष्ट्या स्वच्छता व सुव्यवस्थेचे वातावरण नाही एंकदरीत नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे बाबतीत नगरपालिका उदासीन ठरत आहे.आता विविध विभाग त्यांच्या जिवीतावर सुध्दा उठल्याचे दिसत आहे रस्ता पडलेले खड्डे मोठ्या अपघाताच्या प्रतिक्षेत आहे.रस्त्यावरील बंद पथदिवे काही अनर्थ घडण्याची वाट पहात आहे.तर कोठे लोंबकळत असलेले पथदिवे जिवीताला धोका निर्माण करीत आहेत.अशीच काहीशी परिस्थिती रायपूरा परिसरातील नगरपालिका प्राथमिक शाळेसमोरील पथदिव्याच्या खांबावर दिसत आहे.गेल्या दिड महिन्यापासून या खांबावरच्या पथदिव्याच्या जिंवत तारा व ट्युबलाईट हवेत लोंबकळत असून हवेच्या धक्क्याने कुणाच्या डोक्यावर पडून अनर्थ घडविण्याचे प्रतिक्षेत आहे.जिंवत तारा मुळे विद्युत खांबामध्ये शाँक निर्माण करून पावसाळ्यात कुणाच्या जिवीताला धोका पोहचवू शकतात.स्वच्छता विभागाचे नगरपालिकेने नियुक्त केलेल्या वार्ड जमादार व संबधित विभागाला याची माहिती देऊनही यावर आजपर्यंत कारवाई झालेली नाही.याबाबत नगराध्यक्ष यांना सुध्दा सोशल मिडीयामार्फत सुचना देण्यात आली आहे परंतू अजूनही कोणतीच कार्यवाही झाली नाही जर काही अनर्थ झाला तर याला जबाबदार कोण असा प्रश्न जनता विचारत आहे तसेच काही अनर्थ घडून कुणाच्या जिवीतास धोका झाल्यास पोलिस स्टेशन सरमसपूरा येथे नगरपालिका,दिवाबत्ती विभाग व संबधित अधिकारी व पदाधिकारी यांचे विरुद्ध तक्रार नोंदवली जाईल असा इशारा जनतेने दिलेला आहे.निवेदन देवून उपयोग होत नसल्याने प्रत्यक्ष प्रसिध्दी माध्यमातून ही गोष्ट शासन व प्रशासनासमोर ठेवून न्याय मिळवण्याची चर्चा जनतेत ऐकायला येत आहे.