!! कुराण संपुर्ण मानवजातीसाठी ईश्वरीय ग्रंथ :- ज्येष्ठ पत्रकार -नौशाद उस्मान !!

0
490
Google search engine
Google search engine

महेंद्र महाजन जैन /वाशिम/बुलढाणा


महापुरूषांचं माणुसपण हिरावून त्यांचं दैवतीकरण केल्याने एकप्रकारे त्यांचं महात्म्य कमी करण्याचाच प्रयत्न होत आहेत,या दैवतीकरणामुळे त्या महापुरुषांनी त्यांच्या जीवनात एक माणुस म्हणून केलेल्या अनमोल कार्याचा, त्यांनी समाज सुधारणेसाठी
केलेल्या त्यागाचा आणि त्यांच्या विचारांच महत्व आपण कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत असे विचार ज्येष्ठ पत्रकार तथा प्रसिद्ध इस्लामिक वक़्ते नौशाद उस्मान (औरंगाबाद) यांनी व्यक्त केले.स्थानीक पोलिस स्टेशन आवारात जमात ए इस्लामी हिंद शाखा मेहकर च्या वतीने आयोजित ईद मिलन कार्यक्रमात ते बोलत होते.
स्थानीय पोलिस स्टेशन आवारात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी ज्येष्ठ पत्रकार नौशाद उस्मान होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रदेश कॉंग्रेस कमेटी चे सरचिटणीस श्याम उमाळकर,नगराध्यक्ष कासमभाई गवळी,न.प.उपाध्यक्ष जयचंद बाठिया, उपविभागीय पोलिस अधिकारी आर.आर.वेंजने, तहसीलदार संतोष काकड़े, पोलिस निरीक्षक मोतीचंद राठोड़,कॉंग्रेस नेते लक्ष्मण घुमरे, बामसेफ चे अँड.विष्णु सरदार,मराठा सेवा संघाचे विलास तेजनकर,पत्रकार रफ़ीक कुरैशी,जिल्हा कॉंग्रेस चे सरचिटणीस अँड.अनंत वानखेड़े,भाजपा ज्येष्ठ नेते लक्ष्मीकांत मोहरिल, भाजपा महिला आघाड़ी च्या श्रीमती मंदाकिनीताई कंकाळ,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अँड.शैलेश देशमुख,भाजपा शहर अध्यक्ष प्रल्हाद लष्कर,अदि मान्यवर उपस्थीत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कुराण पठन करण्यात आले त्या नंतर काश्मीर मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्या मध्ये मृत पावलेल्या अमरनाथ यात्रेकरुंना सामूहिक श्रधांजली अर्पित करण्यात आली.पुढे बोलतांना नौशाद उस्मान म्हणाले की कुराण मध्ये मुख्य पाच शिकवणी आहेत त्या मध्ये आदमत्व, एकत्व, अखेरत्व,प्रेषित्व आणि व्यवस्था परिवर्तन आहे या सर्व शिकवणीचा त्यांनी परिचय करून दिला, तसेच ते म्हणाले की कुराण हे संपूर्ण मानवजाती साठी अवतरित झालेला ईश्वरीय ग्रंथ आहे त्या मध्ये मानवी जीवन कसे या बद्दल मार्गदर्शन दिलेले आहे, माणसाला माणुस म्हणून जगण्याचा व एक ईश्वराची भक्ति करुण यशस्वी होण्याचा मूलमंत्र कुराण मध्ये आहे आणि ईस्लाम ही एक जीवन जगण्याची पवित्र पद्धत आहे.रमजान या पवित्र महिण्यांमध्ये कुराण अवतरित झाला आहे म्हणून रमजान ला रहेमत आणि बरक़त चा महीना म्हणून ही संबोधले जाते.या कार्यक्रमात नौशाद उस्मान द्वारा लिखित हज चे प्रवास वर्णन “मक्केची वारी” ह्या पुस्तकाच्या प्रति उपस्थीत मान्यवरांना भेट देण्यात आल्या,या वेळी श्याम उमाळकर,हाजी कासम गवली,अँड .विष्णु सरदार,जयचंद बाठिया, रफ़ीक कुरैशी यांनी ही आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
सफ़दर खान पठाण तर आभार प्रदर्शन मो.रागिब यांनी व्यक्त केले.कार्यक्रम यशस्वीते साठी जुबेर खान, अहेमद खान,ईस्माइल शाह,
मो.अनजर,अयूब खान, जफर खान,यासिर खान, अमजद बागवान,फैजल बागवान,मोहसिन कुरैशी,
शेख मुद्दसिर,शेख अनीस, शकील कुरैशी आदि जमात ए इस्लामी हिंद च्या सदस्यांनी परिश्रम घेतले.