अतिक्रमण हटवण्याकरीता मनसे चे अर्धनग्न आंदोलन मुख्याधिकारी यांच्या कँबिन मध्ये दिले धरणे

0
520
Google search engine
Google search engine

अचलपूर /  श्री प्रमोद नैकेले

 स्थानीक नगर पालिका प्रशासनच्या अक्षम्य दुर्लक्षाने शहरातील कान्याकोप-यात अतिक्रमणाचे जाळे पसरलेले आहे. या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना ( मनसे ) तर्फे एक वर्षापासून नगर पालिका प्रशासन चे लक्ष आकर्षित केल्या जात होते पण लालफीताशाही मध्ये अटकलेली नोकरशाही केवळ आपली जबाबदारी
दुस-यावर ढकलन्याचे काम करत आले. उपविभागीय अधिकारी म्हणतात हे काम नगर पालिका चे आहे ,तर पालिका मुख्याधिकारी उपविभागीय अधिकारी यांच्यावर ढकलतात. परतवाड़ा शहर ला अतिक्रमणापासून वाचवण्यासाठी आज संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी जिल्हा उपाध्यक्ष विंजय पोटे यांच्या नेतृत्वाखाली नगर पालिकेच्या  प्रांगणात अर्धनग्न आंदोलन केले.या आंदोलनाची पूर्व सूचना पालिकेला विधिवत देण्यात आली होती तरीही नगर पालिकेतर्फे एकही जबाबदार अधिकारी उपस्थित नव्हते. प्रक्षुब्ध कार्यकर्ता अखेर मुख्याधिकारी यांच्या कँबिन मध्येें घुसून जोरदार नारेबाजी करू लागले.काही समाज सेवकाच्या समजावण्यावर  मनसे चे कार्यकर्ते कँबिनच्या बाहेर निघाले. त्यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी नगरपालिका परिसरामध्ये अतिक्रमण हटाव च्या घोषणा देत धरणे आंदोलन केले परंतु कोणत्याही अधिकारी अथवा पदाधिका-यास जाग आली नाही.