​*अचलपूर मध्ये चमत्कारीक म्हशीच्या पिलाने घेतला जन्म*

0
417
Google search engine
Google search engine

पिलाला आहेत दोन तोंड -दोन्ही तोंडानी पितो दुध

  

अचलपूर / श्री प्रमोद नैकेले/-


शहरातील हिरापुरा निवासी दूध व्यावसायिक शमिम खान यांच्या म्हशीने चक्क दोन तोडांच्या पिलाला जन्म दिला या निसर्गाच्या चमत्काराला पाहण्यास लोकांनी एकच गर्दी केली होती. ही गोष्ट स्थानीक पशु वैद्यकिय अधिकारी यांच्या लक्षात आणृन दिली त्यांनी तपासणी करून म्हशीचे पिलू  एक दम स्वस्थ असल्याचे सांगितले. शमिम खान यांचे शेत अमरावती रोड वर रणबाबा दर्गा च्या जवळ आहे जेथे त्यांच्या सर्व म्हशी असतात. ते दररोज येथून दूध आणून अचलपूर च्या हाँटेल वाल्यांना देतात आज रविवारी ते जेंव्हा आपल्या शेतात गेले तेंव्हा त्यांना हा चमत्कार दिसला दोन तोंड असलेले पिलू जन्माला आले व ते दोन्ही तोंडाने दूध सुध्दा पित आहे.त्यांनी लगेच पशू वैद्यकिया अधिकारी यांना तपासणी करिता बोलावले तर पशूवैद्यकीय अधिकारी यांनी जन्मलेले पिलू स्वस्थ असल्याची पुष्टी ही बातमी शहरात व आसपासच्या ग्रामीण भागात वा-यासारखी पसरून हज़ारो लोक घटनास्थळी पोहचून निसर्गाचा हा चमत्कार पाहण्यास एकच गर्दी करतांना दिसत होते.