वाहनधारकांनी वाहनाबाबतची कामे स्वत: येवून करावे • उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आवाहन •

0
691
Google search engine
Google search engine

विभागाच्या http://transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर संपर्क करावा

बुलडाणा -वाहनधारकांनी त्यांचे वाहनाबाबत, अनुज्ञप्तीबाबत किंवा इतर कामकाज स्वत: येवून करावे. कोणत्याही अनधिकृत व्यक्तीस आपले कामकाज देवू नये, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पी. के. तडवी यांनी केले आहे.
नागरिकांना कार्यालयातील कामकाजाबाबात कुठलीही तक्रार असल्यास उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किंवा सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचेशी संपर्क साधावा. या विभागाच्या http://transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर विविध अर्ज, शुल्क, कर आकारणी, अपराध व दंड, खाजगी वाहन कर, कर गणना, कर सवलत, संपर्क क्रमांक, ईमेल आयडी आदी उपलब्ध आहेत. तरी याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.