​संवेदनशील पने “ताला ठोको आंदोलन” निपटल – चांदुर बाजार नगर परिषद मधील प्रकरण

0
994
Google search engine
Google search engine

बादल डकरे / चांदुर बाजार –
स्थानिक नगर परिषद मध्ये मागील 1 महिन्याच्या कालावधी पासून स्थानिक मुख्यधिकारी नसल्याने जनतेला त्याचा मोठा फटका बसत होता त्यामुळे सत्ते असलेले आणि महिला बालकल्याण  समिती सभापती वैशाली ताई घुलक्षे यांनी दिनांक 24 जुलै पर्यंत स्थानिक मुख्यधिकारी यांची नियुक्ती करावी अन्यथा दिनांक 25 जुलै ला स्थानिक नगर परिषद च्या इमारतीला कुलूप लावणार असल्याचा इशारा त्यांनी नगर परिषद कडे आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेल्या तक्रारी मध्ये केला होता.
आज दिनांक 25 ला नगर परिषद येथे त्या आल्या असता नगर अध्यक्ष यांनी मुख्यधिकारी हा खूप गंभीर प्रश्न असून या संबंधी वरिष्ठ याना कळविले आहे तसेच राज्यचे गृहराज्य मंत्री श्री  रणजित पाटील आणि पालकमंत्री यांच्या त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी यांच्या चर्चा झाली असून येणाऱ्या 15 दिवसाच्या कालावधी मध्ये मुख्यधिकारी याचा प्रश सुटतील असे लेखी आश्वासन नगरध्यक्ष रवींद्र पवार आणि महिला बालकल्याण समिती सभापती वैशालिताई घुलक्षे यांना दिले.
सत्तेमधील पदाधिकारी आंदोलन करणार यामुळे आज स्थनिक नगर परिषद येथे चांगलाच पोलीस बंदोबस्त पाहावयास मिडाला.

यावेळी नगर परिषद चर्चे दरम्यान  उपाध्यक्ष लाविनाताई आकोलकर गटनेता मनीष नागलिया,अतुल रघुुवांशी,विजय विल्हेकर,आनंद अहिर, उपस्थित होते

महिला बालकल्याण समिती सभापती वैशालीताई घुलक्षे यांची आंदोलन करण्याची भूमिका चांगली होती.आम्ही त्याच्या प्रश्नाशी सहमत आहे .वरिष्ठ पातळीवर झालेल्या चर्चेचा आम्ही पाठपुरावा करू आणि लवकरच चांदुर बाजार नगर परिषद येथे स्थानिक मुख्यधिकारी आणू अशी प्रतिक्रिया रवींद्र पवार नगर अध्यक्ष यांनी माध्यमांशी बोलताना दिली.