जिल्हास्तर शालेय ज्युदो क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन संपन्न

0
1246
Google search engine
Google search engine

बुलडाणा-

 

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, म.रा. पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलडाणा व्दारा आयोजित जिल्हास्तर शालेय ज्युदो क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन 3 ऑगस्ट 2017 रोजी सकाळी 11.30 वा. क्रीडा अधिकारी भाऊसाहेब जाधव, राष्ट्रीय खेळाडू ज्युदो तुषार मोहन काचकुरे, राष्ट्रीय खेळाडू संदीप जाधव, पंकज वानखडे, अरविंद अंबुसकर, विजय अंबुसकर, अनिल अंबुसकर यांचे उपस्थितीत संपन्न झाले.
प्रास्ताविक भाऊसाहेब जाधव यांनी केले. संदीप जाधव व तुषार काचकुरे यांनी यावेळी खेळाडूंना मार्गदर्शन केले. या स्पर्धेमध्ये विविध तालुक्यातुन 14,17,19 वर्षाआतील मुले/मुली 100 हुन अधिक खेळाडू उपस्थित होते. स्पर्धेला पंच म्हणून संदीप जाधव, तुषार काचकुरे, पंकज वानखडे, विजय अंबुसकर, सुहास राऊत उपस्थित होते. तसेच माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राम जाधव यांचेहस्ते विजयी/उपविजयी खेळाडूंना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. संचालन व आभार अनिल इंगळे यांनी मानले. स्पर्धा आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयातील अधिकारी अनिल इंगळे, पी.पी. खर्चे, बी.आर. जाधव, जी.एम. वरारकर यांच्या प्रयत्नांमध्ये करण्यात आले, असे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे.