तीन अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणार्‍या २ नौसैनिकांना कारावास

0
576
Google search engine
Google search engine

समाजात सर्वच स्तरांवर झालेले नैतिक अध:पतन रोखण्यासाठी धर्मशिक्षण देणे अनिवार्य !

 

 

मुंबई – नौदल कर्मचार्‍यांच्या ३ अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणार्‍या दोन नौसैनिकांवर नौदलाने कोर्टमार्शल करून त्यातील एकाला १५ वर्षे, तर दुसर्‍याला १२ वर्षांच्या सक्षम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. या दोघांना नौदलातून बडतर्फही करण्यात आले असून, लहान मुलांना लैंगिक छळापासून संरक्षण देणार्‍या सन २०१२ च्या कायद्यानुसार (पोक्सो) नौदलात झालेली ही कठोर शिक्षा आहे. (स्वत:च्या सहकार्‍यांच्या मुलींवर वाईट दृष्टी ठेवणार्‍या सैनिकांची मानसिकता किती विकृत आहे, यातून स्पष्ट होते. यासाठी सर्वच स्तरांवर केवळ कार्यानुरूप शिक्षण न देता त्याला धर्मशिक्षणाची जोड देणे किती आवश्यक आहे, हे लक्षात येते ! – संपादक)

कारवार येथील नौदलच्या तळावर जुलै २०१५ मध्ये या बलात्कारांच्या घटना घडल्या होत्या. तळावरील इलेक्ट्रिकल शाखेतील या २ नौसैनिकांनी आपल्या सहकार्‍यांच्याच ३ अल्पवयीन मुलींना फसवून त्यांच्यावर बलात्कार केले होते. दोघांना अटक झाल्यानंतर त्यांच्या विरोधात नौदलाच्या पश्‍चिम विभागाकडून कोर्टमार्शलची प्रक्रिया चालू करण्यात आली होती. पोक्सो कायद्यानुसार नौदलाने पीडित मुलींची ओळख घोषित न करण्याची दक्षता घेतली आहे. या प्रकरणातील इतर माहिती, तसेच दोषींची ओळखही गुप्त ठेवण्यात आली आहे, अशी माहिती नौदल प्रवक्त्याने दिली.