नक्की शेयर करा -धामणगाव रेल्वे तालुक्यातील युवकांचा एक आगळा वेगळा उपक्रम…..

0
699
Google search engine
Google search engine

 


सोशल मिडीया हा नुसताच मनोरंजनाचे साधन नसून त्याद्वारे आपण समाजात एक वेगळा संदेशही देऊ शकतो हे धामणगाव तालुक्यातील युवकांनी शक्य करून दाखवले. आज सकाळी 10.३० च्या सुमारास यवतमाळ अंजनसिंगी बायपासवर शिरभाते नामक महिलेचा अपघात एका स्पीड ब्रेकरनी झाला असता ही माहीती स्थानीय रहीवासी कुंदन ठाकूर यांना कळताच यांनी माणूसकीचा धर्म अंगी बाळगत घटना स्थळ गाढून त्वरीत जखमींना स्थानिक सरकारी दवाखान्यात भरती केले व ही माहीती आपल्या व्हॉट्सअप ग्रुप “जय जवान जय किसान” या ग्रुपला टाकली असता कळल की या जखमी महिलेचे माहेरघर हे जुना धामणगाव हे असून ही माहिती ग्रुपला बघताच या ग्रुपवरील अन्य सदस्यांनी ताबडतोब जुना धामणगाव येथील महिलेच्या कुटुंबातील सदस्यांनी दिली व या घटनेची दखल घेत कुटुंबातील सदस्यांनी दवाखाना गाठला आता महिलेची प्रकृती स्थिर आहे. परंतु सदर हे प्रकरणात मदत म्हणून कुंदनजी यांनी ग्रुपवर चर्चा सुरू केली साधारण बाब लक्षात घेता त्या स्पिड ब्रेकर वरती कसलेही सांकेतिक चिन्ह नसल्याने हा अपघात घडला हे लक्षात आले म्हणून “जय जवान जय किसान” या व्हॉट्सप ग्रुपला ही चर्चा सुरू असताना आपण सर्व ग्रुप सदस्य या ठिकाणी पुढाकार घेऊ ग्रुपचे ॲडमीन वैभव देशमुख नी मार्ग म्हणून चर्चा केली असता कुंदनभाऊ ठाकूर यांनी पूर्व तयारी करत त्या महिलेली त्या घटनास्थळी झालेला ञास बघत आधीच कलर पेंट आणून आज सायंकाळी आपले सर्व मिञ मंडळी समुहाचे सदस्य कुंदनभाऊ ठाकूर, शुभमभाऊ किन्नाके नगरसेवक धामणगाव, वैभव देशमुख ॲडमीन “जय जवान जय किसान ग्रुप”, परिक्षीत पिंपळे, अक्षय अर्जुने, मयुर वानखडे तथा सर्वांनी पुढाकार घेत या ठिकाणी ब्रेकरला पांढऱ्या रंगाचे सांकेतिक चिन्ह टाकून परत अशी घटना नको घडायला म्हणून स्वतः जाऊन आखणी केली.

सांगायचं तात्पर्य इतकच की या युवकांनी आज सिद्ध करून दाखविले सोशल मिडीया हे नुसतच मनोरंजनाचे साधन नसुन शक्य असल्यास आपण परिस्थितीशी दोन हात करत बदल घडवू शकतो हे देखील शक्य आहे.