इंटरसिटी, जबलपुर एक्सप्रेससह इतर रेल्वे गाड्यांचा थांबा द्या -नितीन गवळींचे नेतृत्वात दिल्ली व नागपुर रेल्वे बोर्डात हजारो स्वाक्षऱ्यांचे निवेदन

0
638
Google search engine
Google search engine

चांदुर रेल्वे – (शहेजाद खान ) –


अनेक दिवसापासुन शहरवासीयांची मागणी असलेल्या रेल्वे थांब्याचा प्रश्न आता पुन्हा चिघडण्याची शक्यता दिसत आहे. हजारो स्वाक्षऱ्यांचे निवेदन नुकतेच दिल्ली व नागपुर रेल्वे बोर्डात रेल रोको कृती समितीचे नितीन गवळी यांच्या नेतृत्वात देण्यात आले व आता थांबा न मिळाल्यास तीव्र आंदोलनाची शक्यता सुध्दा वर्तविण्यात येत आहे.

    मोठी बाजारपेठ असणारे चांदूर रेल्वे तालुका हा सर्वांत मोठा तालुका म्हणून गणल्या जात होता. चांदुर रेल्वे, तिवसा, धामणगाव, नांदगाव अशा तालुक्यासह यामध्ये नोंद होती. मात्र राजकीय दूरदृष्टीपणा षडयंत्रात तालुका गोवल्या गेला आहे. या मतदारसंघात नेहमी सामान्य नागरिकांच्या प्रश्नाला बगल दिली गेली. आपापले झेंडे लावण्यातच येतील राजकीय पक्षांच्या नेत्यांना भूषण वाटत गेले. गेल्या अनेक वर्षांपासून येथील नागरिक काही रेल्वेगाड्यांचा थांबा मागत आहे. याबाबत रेल रोको कृती समिती द्वारे मोर्चे, आंदोलने, निवेदनही पाच वर्षांपूर्वीच दिले गेले. तोव्हा काँग्रेसचे खासदार यामध्ये असफल झाले. त्यानंतर लोकांनी भाजपचे खासदार तडस यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून आणले.  यांचेसुद्धा तीन वर्ष पूर्ण झाले. त्यांनी तीन महिन्यातच थांबा करून देण्याचे वचन दिले होते. मात्र अद्यापही हा निर्णय प्रलंबितच आहे. हा विषय राजकीय नाहीच हे लोकांचे नागरिकांचे आंदोलन आहे. शहरवासीयांनी नवीन गाड्या सुरू करा किंवा सुपर एक्सप्रेस गाड्यांना थांबा मागितला असेही नाही. ज्या गाड्या धामनगाव, पुलगाव अशा स्टेशनवर थांबतात त्या गाड्यांना शहरात सुद्धा थांबा देण्यात याव्या अशी साधी मागणी शहरातील नागरीकांची आहे. या आंदोलनानंतर स्व. डॉ. पांडुरंग ढोले यांनी माहितीच्या अधिकारात रेल्वे विभागाला माहिती मागितली होती,  त्यामध्ये रेल्वे विभागाने लेखी पत्र दिले की अमरावती-टिमटाला ही सुरू केलेली कॉर्डलाईनमुळे तेवीस मिनिटे वाचली. तरीही रेल्वे विभाग दोन मिनिटाचा थांबा चांदुर रेल्वेला का देत नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे व हा चांदुर रेल्वे वासीयांवर झालेला एक अन्यायच असल्याचे मत नितीन गवळींनी व्यक्त केले. या विषयी खासदार रामदास तडस, खासदार आनंदराव अडसुळ, माजी खासदार दत्ता मेघे यांनी काही वर्षापुर्वी रेल्वे विभागाला पत्र लिहले होते.  मात्र त्याला अजुनही यश आले नाही.  त्यामुळे आता नव्या जोमात रेल रोको कृती समिती आक्रमक झाली असुन दिल्ली व नागपुर रेल्वे बोर्डात स्वत: जाऊन नितीन गवळींच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. इंटरसिटी, जबलपुर एक्सप्रेस, गोंडवाना एक्सप्रेस, नागपुर-पुणे एक्सप्रेससह इतर रेल्वे गाड्यांचा थांबा द्या अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळेस थांबा न मिळाल्याच शहरवासी पुन्हा रस्त्यावर उतरण्याच्या स्थितीत दिसत आहे.
    दिल्ली व नागपुर रेल्वे बोर्डात निवेदन देतेवेळी रेल रोको कृती समीतीचे नितीन गवळी, कॉ. विनोद जोशी, मेहमुद हुसेन, कॉ. विजय रोडगे, विनोद लहाने, अजय चुने, पंकज गुडधे, बंडुभाऊ यादव, भीमराव खलाटे, महादेवराव शेंद्रेसह आपचे महेश देशमुख, अर्जुन सदार, मदन शेळके, अॅड. सि. एच. शर्मा आदी उपस्थित होते.