भुरट्या चोरांमुळे शहरवासी त्रस्त नागरीकाना भयमुक्त करा भाजपा कार्यकर्त्यांनी घेतली ठाणेदारांची भेट

0
725
Google search engine
Google search engine

चांदुर रेल्वे – (शहेजाद खान ) 

 

चांदुर रेल्वे तालुक्यासह शहरात पसरलेल्या भुरट्या चोरांच्या घटनेमुळे  नागरीकांची  झोप  उडाली असून  लोकं रात्रंभर  जागून  स्वतः चे  रक्षण करत आहे. त़्यामुळे या भुरट्या चोरांना तत्काळ अटक करा अशी मागणी स्थानिक भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा व भा.ज.पा. शहर कमेटी वतीने ठाणेदार शेळकेंना करण्यात आली.
तालुक्यातील मांजरखेड कसबा, बासलापुर, चिरोडीसह पोहरा या गावात रात्रीचे चोर शिरत असून त्यांनी अनेकांच्या घरात धुमाकूळ घातला असल्याच्या चर्चा गेल्या दोन तिन दिवसापासून संपुर्ण तालुक्यात सुरु असून त्यांना पकडण्यासाठी हे चार ही गांव रात्रीला जागत आहे. तर गुरूवारी रात्रि हेच चोर शहरात शिरले असल्याचे ही चर्चा दिसून आली. त्यामुळे या भुरट्या चोरांना शहरवासी त्रस्त झाले असतांना भाजपाच्या वतीने याबद्दल ठाणेदार शेळकेंची शनिवारी भेट घेतली. व निवेदन देऊन शहरवासीयांना भयमुक्त करण्याची मागणी केली.
ठाणेदार शेळकेंनी चर्चा सत्रामध्ये  सांगितले  कि,  आमचा  गाड्या आणि रात्रीचे ड्युटी करणारे ६ कॉन्स्टेबल रोज चांदुर रेल्वे व जवळील मांजरखेड कसबा व बासलापूर या गावांमध्ये  सुध्दा त्यांची ड्युटी करत असून गाड्यांचा राऊंड  रात्रभर  चालू आहे. परंतु कार्यकर्त्यांचे म्हणणे पडले कि, पोलीसांच्या गाडीच्या आवाजमुळे चोर  येऊन लपून राहतात. तेव्हा ठाणेदार यांनी त्यावर पर्याय काढत रोज 2 कॉन्स्टेबल चांदुर रेल्वे येथे पायदळ जनतेच्या सेवेमध्ये पाठविण्याचा निर्णय  घेतला असून ते स्वतः पण पेट्रोलिंग  करत आहे. त्यासोबतच 2 पोलीस शिपायांना पाठबळ देण्या￰करीता भारतीय जनता युवा मोर्चाचे ४  कार्यकर्ते  रात्रभर पोलीस पथकाबरोबर राहणार असुन त्यामुळे आता त्या भागामधील लोकांना शांतपणे झोपता येणार आहे असे भाजपाच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष  प्रमोद नागमोते, युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष सचिन लांजेवार , युवा मोर्चा शहर अध्यक्ष  पवन ठाकुर, बाळासाहेब  सोरगिवकर , वरिष्ठ उपाध्यक्ष  गुड्डूभाऊ  बजाज , संदीप सोळंके,  चेतन तितरे , मनोज   जयस्वाल , केशव वंजारी , मुन्ना  शर्मा , हरीश  वऱ्हाडे  , सुभाष  मते  , अतुल शिरभाते,  संदीप मेश्राम सह माजी  नगरसेवक हिम्मत   डोनेकर , विजु इमले, वर्धन इंगोले , टिल्लूसेठ गणेडीवाल, लोकेश माकोडे तसेच इतर कार्यकर्ते व माहिला आघाडीचा मोठा  ताफा उपस्थित होता.