*शारदा विसर्जन आटोपून परत जात असलेल्या डी.जे.वरून पडून एका युवकाचा मृत्यू*

0
1011
Google search engine
Google search engine

अचलपूर / श्री प्रमोद नैकेले /-

सरमसपुरा पोलीस स्टेशन अंतर्गत मोहरम,नवदुर्गा व शारदा विसर्जन शांततेत पार पडले पण काल रात्री झालेल्या एका अपघाताने सर्वत्र शोककळा पसरली.
सरमसपुरा पोलीस स्टेशन अंतर्गत मोहरम,नवदुर्गा व शारदा विसर्जन शांततेत पार पडले कोणतीच अनुचित घटना घडू नये म्हणून आवश्यक त्या खबरदारी पोलिस प्रशासनाने घेऊन शांतता व सुव्यवस्थेचे वातावरण निर्माण व्हावे म्हणून चोख बंदोबस्त ठाणेदार अभिजित अहिरराव यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस अधीक्षक रवी रेवतकर व त्यांच्या सहकारी वर्गाने ठेवला होता.सर्व शांततेत पार पडले परंतू काल रात्री एक अपघाच्या घटनेने सर्व वातावरण सुन्न करून टाकले.सरमसपुरा येथील युवक दिपक गणेशराव बोकडे (30) हा आपला डी.जे. एक शारदा विसर्जन आटोपून घरी परत जात असतांना त्याचा पाय लोंबकळत असलेल्या विद्युत तारेला अटकला व तोल सुटून खाली कोसळला व त्यातच त्याचा मृत्यू झाला.प्रथमदर्शनी शाँक लागून मृत्यू झाल्याचे दिसत असले तरी शवविच्छेदना नंतर मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल मात्र या घटनेने परिसरातील नागरिकांत शोक पसरला आहे कारण दिपक हा सर्वत्र परिचित असून प्रत्येक कार्यात अग्रेसर असायचा नुकताच त्याने सवाईपुरा येथील एका बिछायत मालकासोबत भागीदारी तत्वावर डि.जे.चा व्यवसाय सुरु केला होता पण अचानक झालेल्या या घटनेने त्याचे आईवडील,भाऊ यांच्या सह परिसरातील नागरिकात
दु:खाचे सावट पसरून हळहळ व्यक्त होत आहे.घटनेची नोंद सरमसपुरा पोलीस स्टेशनला करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.