अवैधपणे विक्री होत असलेल्या चिनी बनावटीच्या फटाक्यांवर बंदी घाला – हिंदु जनजागृती समिती

0
595
Google search engine
Google search engine

कोल्हापूर –

 

भारतात फोफावलेल्या चीनच्या वस्तूंच्या व्यापारात गेल्या काही वर्षांपासून चीनचे फटाकेही मोठ्या प्रमाणात आले आहेत. त्यामध्ये विषारी पदार्थांचे प्रमाण खूप असते. भारत सरकारने चिनी फटाक्यांवर या दिवाळीच्या निमित्ताने बंदी घातलेली आहे. एक्सप्लोजिव्ह एक्ट २००८ नुसार परदेशी बनावटीचे स्फोटक पदार्थ बाळगणे आणि त्याची विक्री करणे हा दंडनीय अपराध आहे. असे असले, तरी अवैध मार्गांनी चिनी फटाके भारतात आणले जाऊन त्याची विक्री होते. यामुळे अशा फटाक्यांवर प्रशासनाने तात्काळ बंदी आणावी, तसेच देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेल्या फटाक्यांची निर्मिती अन् विक्री कायमची बंद व्हावी, अशा मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने जिल्हाधिकार्‍यांच्या नावे देण्यात आले. हे निवेदन नायब तहसीलदार अपर्णा मोरे यांनी स्वीकारले.

या वेळी शिवसेनेचे करवीरतालुकाप्रमुख श्री. राजू यादव, शिवसेनेचे श्री. किशोर घाटगे, हिंदु महासभेचे श्री. मनोहर सोरप, जिल्हाध्यक्ष श्री. नंदकुमार घोरपडे, हिंदु महासभेच्या सरोज फडके, विश्‍व हिंदु परिषदेचे श्री. अशोक रामचंदानी, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री सुधाकर सुतार, शिवानंद स्वामी उपस्थित होते.