ठळक बातम्या

0
1104
Google search engine
Google search engine

#V24News
 *चांदुर रेल्वे*- अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे शहरात अनेक रेल्वे गाड्यांचे थांबे मिळावे यासाठी 15 ऑक्टोबर 2012 ला मोठे रेल रोको आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाला उद्या रविवारी 5 वर्ष पुर्ण होत असल्यानंतरही थांबा मिळाला नसल्यामुळे रेल रो­को कृती समिती 15 ऑक्टोंबर, रवि­वारी बेशरमच्या झाडासह स्टेशन मास्तरांना निवेदन देऊन निषेध नोंदविणार असुन खासदार राम­दास तडस व रेल्वे प्र­शासनाविरोधात ना­रेबाजी करण्याचा इशारा सुध्दा दिला आहे. 

#V24News
*यवतमाळ*- फवारणीचा आणखी एक बळी, मधुकर पोतीराम बावने (45) यांचा मृत्यू, मृतांचा आकडा 21 वर पोहोचला.

कीटकनाशक फवारणीतील शेतकरी बळींची संख्या २१ वर जाऊनही अद्याप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यवतमाळला भेट दिली नाही.

#V24News
*नागपूर – विदर्भात धुमाकूळ घालणा-या वाघिणीचा बोर अभयारण्याच्या हद्दीत मृत्यू, वीजेच्या धक्क्यानं मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती*

#V24News

यवतमाळ – बसने चिरडल्याने पाचवीत शिकणा-या मृणाली राजुरकर या विद्यार्थिनीचा मृत्यू, नागपूर – यवतमाळ मार्गावरील शिरपूर येथील घटना, संतप्त जमावाने यवतमाळ – नागपूर मार्गावरची वाहतूक ठप्प केली.

#Vidar24News