अवैधपणे विक्री होत असलेल्या चिनी बनावटीच्या फटाक्यांवर बंदी घाला ! – हिंदु जनजागृती समितीचे प्रांत कार्यालय आणि शहर पोलीस ठाण्यात निवेदन

0
1232
Google search engine
Google search engine

मिरज– अवैधपणे विक्री होत असलेल्या चिनी बनावटीच्या फटाक्यांवर बंदी घालावी, तसेच देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेल्या फटाक्यांची निर्मिती अन् विक्री कायमची बंद व्हावी, अशा मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने प्रांत कार्यालय आणि शहर पोलीस ठाण्यात देण्यात आले. या वेळी शिव सहकार उद्योग सेनेचे श्री. पंडितराव (तात्या) कराडे, प्रवासी सेनेचे श्री. संदीप गंगधर, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री मनोज गवळी, प्रकाश पोरे, सनातन संस्थेचे श्री. महादेव जाधव उपस्थित होते.