दिवाळीच्या गोडव्यात आ.डॉ.अनिल बोंडे यांची भर.- वरुडात स्वामी जितेंद्रनाथ महाराजांच्या हस्ते गरजूंना साखर वाटप.

0
547
Google search engine
Google search engine

वरुड (अमरावती) :

आ.डॉ.अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीने दिवाळीत गोर – गरिबांच्या जीवनात गोडवा निर्माण करता यावा, यासाठी मोर्शी – वरुड विधानसभा मतदार संघातील गरजवंत लाभार्थ्यांना एकशे एक क्विंटल साखर वाटप केली जाणार आहे. शुक्रवार शहरातील पंडित दीनदयाल उपाध्यय सभागृह येथे श्रीनाथ पीठाधिश्वर स्वामी जितेंद्रनाथ माहाराज यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
भारतीय जनता पार्टीच्या वतीने वरुड – मोर्शी मतदार संघातातील गरजवंत रास्त राशन धारकांना साखर वाटप केली जात आहे. आ.डॉ.अनिल बोंडे यांच्यामुळे मतदार संघातील नागरिकांच्या दिवाळीत गोडवा निर्माण झाला आहे. शहरात असलेल्या प्रत्येक भागातील तसेच ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना लाभ मिळावा म्हणून पंडित दीनदयाल उपाध्यय सभागृह येथून पहिल्या टप्प्यात साखर वाटपाला सुरवात करण्यात आली आहे. त्यामुळे सामान्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहावयास मिळत आहे. आ.डॉ.अनिल बोंडे दरवर्षीप्रमाणे यावर्षी हि मतदार संघातील गरजवंत नागरीक व अमरावती येथील मधुबन वृद्धाश्रमात आपला दिवाळीचा उत्सव वृद्धांसोबत साजरा करणार असल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली आहे.

यावेळी मातोश्री त्रिवेणी बोंडे महिला सूतगिरणी मोर्शीच्या अध्यक्षा डॉ.वसुधा बोंडे, वरुड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा स्वाती आंडे, शेघाट नगर परिषदेचे नगराध्यक्ष रुपेश मांडवे, न.प.वरुडचे उपाध्यक्ष किशोर भगत, भाजपा तालुकाध्यक्ष देवेंद्र बोडखे, शहराध्यक्ष नरेंद्र फसाटे, पंचायत समिती सदस्य अंजली तुमराम, न.प.वरुडच्या सभापती नलिनी रक्षे, गटनेता नरेंद्र बेलसरे, सभापती हरीश कानुगो, मनोज गुल्हाने, राजू सुपले, पुष्पा धकीते, गटनेता नरेंद्र बेलसरे, नगरसेवक योगेश चौधरी, संतोष निमगरे, प्रीतम अब्रुक, नगरसेविका भारती माळोदे, रेखा काळे, प.स.सदस्या अंजली तुमराम तसेच जि.प.माजी सभापती अर्चना मुरुमकर, बाळूभाऊ मुरुमकर, शेघाट नगर परिषदेचे उपाध्यक्ष धनराज अकर्ते, सुभाष गोरडे, विशाल सावरकर, मंगलू पंधराम, गजानन कपिले, सतीश अकर्ते, नलिनी कांडलकर, जया श्रीराव, राजेश्री डोईजोड, मंदा वसुले, मोनिका भोंगाडे, सारिका बेलसरे, हर्षा घोरपडे, सुनीता वंजारी, भारत खासबागे, आसिफ खान, शंकरराव चोबितकार, समीर ठाकरे, राजेंद्र काळे, रामा खोडे, हारून शहा, हर्षल रक्षे, रजत धकीते यांच्यासह आदी नगरसेवक, भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.