अनिकेत कोथळे हत्या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकसह सहा कर्मचा-यांना 12 दिवसांची पोलीस कोठडी

0
931
Google search engine
Google search engine

सांगली: लूटमारप्रकरणी अटकेत असलेल्या अनिकेत अशोक कोथळे या आरोपीचा सांगली पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला. या प्रकरणाचा मुख्य सुत्रधार पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे याच्यासह पाच पोलीस व एक झिरो पोलीस यांना सांगली आज जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने 12 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यावेळी कोर्ट परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याशिवाय युवराज कामटेंसह 5 जणांना बडतर्फ करणार असल्याची माहिती कोल्हापूर विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी दिली आहे.
पोलीस कोठडीतून पलायन केल्याचा दावा केलेल्या अनिकेत अशोक कोथळे वय 26 या युवकाचा कोठडीतच खून करून त्याचा मृतदेह आंबोली घाटात पोलीसांनीच जाळला असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा खून पटविण्यासाठी कामटेंच्या पथकाने आरोपी पळून गेल्याचा बनाव रचण्यात आला, हे आता स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी कामटेंसह पाच पोलिस व एक झिरो पोलिस अशा सहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.