विद्यापीठात भारताचे प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती ‘बालक दिन’ म्हणून साजरी

0
761
Google search engine
Google search engine

अमरावती.-

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान, भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती ‘बालक दिन’ म्हणून साजरी करण्यात आली. यावेळी प्र-कुलगुरु डॉ. राजेश जयपूरकर, कुलसचिव डॉ. अजय देशमुख, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.जे.डी. वडते, वित्त व लेखा अधिकारी डॉ. शशीकांत आस्वले, संचालक डॉ. श्रीकांत पाटील यांनी पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या प्रतिमेचे पूजन, हारार्पण करुन विद्यापीठाच्यावतीने अभिवादन केले. यावेळी विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक विभागांचे विभागप्रमुख, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.