*अंजुमन मध्ये माजी विद्यार्थ्यांचे ऐतिहासिक स्नेहसंमेलन*

0
1132
Google search engine
Google search engine

खामगाव –

येथील अंजुमन ज्युनिअर कॉलेज मध्ये 1997-98 मध्ये बारावीत असलेल्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन दिनांक 12 नोव्हेंबर रोजी पार पडले. सोशल मीडिया चे अस्तित्व नसतांना एकमेकांपासून दूर गेलेले आर्ट व सायन्स चे सर्व विद्यार्थी 20 वर्षानंतर व्हाट्सऍप ग्रुप च्या माध्यमाने पुन्हा एकत्र आले.या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अंजुमन च्या नऊ माजी विद्यार्थ्यांना “नऊ रतन” पुरस्काराने सम्मानित करण्यात आले.यात सेवानिवृत्त नगर रचना उपायुक्त मोसिकुल्लाह खान साहब,अंजुमन चे माजी सुपरवाइज़र एस एस पीरज़ादा,सीनियर जर्नलिस्ट मुहम्मद फ़ारूक़ सर,ऍडोकेट टी.एम.हुसैन, डॉक्टर अख़्तर हुसैन, कवी सय्यद सुबहान अंजुम, सामाजिक कार्यकर्ते अनीस जमादार, सामाजिक कार्यकर्ते शोहरत हुसैन,हर्डल स्पोर्ट चैंपियन खान सखाउल्लाह ज़हीरुल्लाह यांचा समावेश आहे.अनेक वर्षांनंतर एकत्र आलेल्या मित्रांनी एकमेकांचे विचार जाणून घेतले.कॉलेजच्या आठवणी विषयी बोलतांना अनेक मित्रांना आपले अश्रू आवरता आले नाही.या बॅच ला शिकविणारे अनेक शिक्षक सेवानिवृत्त झालेले आहेत.ह्या सर्व शिक्षकांना तसेच अंजुमन च्या सर्व कार्यरत शिक्षकांना आमंत्रित करण्यात आले होते.संस्थेचे अध्यक्ष डॉ.वकारूलहक़ खान यांना उत्कृष्ट प्रशासन व कामगिरी बद्दल “अनमोल रतन” पुरस्काराने सम्मानित करण्यात आले तसेच सर्व आजी-माजी शिक्षक व माजी विद्यार्थ्यांचा मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य बदरुद्दीन अन्सारी व अज़ीज़ खान,माजी गणित शिक्षक मुदस्सर हुसैन ज़ैनवी,माजी भौतिकशास्त्र शिक्षक बासित सर,जीवशास्त्र शिक्षक व सद्याचे प्राचार्य सय्यद मुनीर सर,माजी इंग्रजी शिक्षक शकुर सर,भूगोल शिक्षक आरिफ सर,माजी गणित माध्यमिक शिक्षक व तत्कालीन हॉस्टल इंचार्ज मुहम्मद ज़ियाउद्दीन सर,फैज़ुल्लाह सर,शरीफ सर,फ़ज़ील सर,खालिद सर,शकील सर,रहबर सर,अनवर सर,ज़हीर सर,तत्कालीन गार्ड अज़ीज़ भाई, रहबर भाई, तत्कालीन हॉस्टल स्वयंपाकी शरीफा व मुन्नी खाला इत्यादी आजी माजी शिक्षक व स्टाफ उपस्थित होता.देहांत झालेले माजी रसायनशास्त्र शिक्षक नसीम सर,माजी प्राचार्य उस्मान सर इत्यादी शिक्षक व माजी विद्यार्थी फरहान,इक़बाल इत्यादींची आठवण करण्यात आली.माजी विद्यार्थी व शिक्षकांनी शाळा व कॉलेज जीवनाविषयी आपआपले विचार प्रकट केले.माजी विद्यार्थी केजीएन कन्स्ट्रक्शन चे मालक गुलज़मां शाह,मुहम्मद अज़हर जमादार,सय्यद तनवीर,मुहम्मद इसहाक़,डॉ.असद फहीम, इंजीनियर आयतुल्लाह खान,AMUSS जिल्हा अध्यक्ष अ.सईद, जावेद खान,अब्दुससत्तार(बाबा पहेलवान)इत्यादींच्या विशेष प्रयत्नाने सफल झालेल्या या स्नेहसंमेलनात असलम परवेज़,शारिक कुरेशी,मुहम्मद यूसुफ,मुशताक अहमद,डॉ.रिज़वान,मुहम्मद वसीम,मुहम्मद आसिफ,तारिक़ुस्सईद,ग़ाज़ी खान,माजिद अली खान,मुहम्मद माजिद,साजिद कुरेशी,असद खान,मोहतसिनुल्लाह खान,मुहम्मद अनसार, फखरुद्दीन(बब्बी),इमरान खान,शकील अहमद,मुहम्मद रियाज़,अब्दुल हफ़ीज़,रिज़वान खान,अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटनेचे राज्य सचिव शेख ज़मीर रज़ा इत्यादी माजी विद्यार्थी उपस्थित होते.काही माजी विद्यार्थी तर मुंबई,पुणे,नागपूर सारख्या ठिकाणावरून आले. माजी विद्यार्थी इंजीनियर रियाज़ अहमद यांनी प्रदेशातुन शुभेच्छा दिल्या तर अचानक वडिलांची तब्येत बिघडल्याने उत्तर प्रदेश येथे कार्यरत माजी विद्यार्थी व आयएएस अधिकारी ज़ुबैर हाशमी उपस्थित होऊ शकले नाही.अंजुमन हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज च्या ऐतिहासिक इमारतीत पार पडलेल्या या ऐतिहासिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी डॉ.वक़ारूलहक़ खान होते.सूत्रसंचालन कवी अनस नबील यांनी केले.प्रस्तावना डॉ.असद फहीम यांनी तर आभार प्रदर्शन शेख ज़मीर रज़ा यांनी केले.