कृषीपंपाला रिडिंग प्रमाणे विज बिल द्या – टाकरखेडा शंभू  येथील शेतक-यांचे पालकमंत्र्याना निवेदन

0
1263
Google search engine
Google search engine

गजानन खोपे /
टाकरखेडाशंभू –

टाकरखेडा शंभू हा परिसर खारपान पट्टा असल्याने आधीच पाण्याची चणचण असुन त्यात कृषीपंपधारकांना रिडिंग प्रमाणे बिल न आकारता अवाढव्य बिल दिल्या जात आहे.त्यामुळे शेतक-यांना रिडिंगप्रमाणेच बिल अदा करावे या मागणी करिता टाकरखेडा संभु येथील शेतक-यांनी पालकमंत्र्यी प्रविण पोटे यांची भेट घेतली.
परिसरात कृषीपंपधारकांना रिडिंगप्रमाणे बिल न देता ‘आवरेज’ बिल दिल्या जात आहे.त्याच भारनियमनामुळे आणी खारपट्यामुळे शेतकरी त्रासुन गेला आहे.त्यात या आवरेज बिलामुळे शेतक-यांवर आर्थिक संकट कोसळले आहे.त्यामुळे सदर बिल कमी करुन ते रिडिंग प्रमाणे देण्यात यावे.या मागणीचे निवेदन टाकरखेडा संभु येथिल नागरिकांनी पालकमंत्री प्रविण पोटे यांना दिले आहे.या शिष्टमंडळात माजी सरपंच दिपक पाटील,दिलीप वानखडे,राजु निमकर,संजय टवलारे,सुरेंद्र देशमुख,विजय भंडागे,दिलीप महस्के,नितिन नाचनकर,सुदेश नाचनकर,सुरेश पाटील,सुभाष पुनसकर,राजु पाटील,मोहन देशमुख,प्रविण देशमुख आदीसह शेतकरी उपस्थित होते.