अमरावती येथे शालेय विद्यार्थीनीवर ‘अॅसिड अटॅक’ …?

0
559
Google search engine
Google search engine

पिडिता ९ वी ची विद्यार्थीनी

अमरावती : स्थानिक शहरातील अतिशय व्यस्त असलेल्या मालटेकडी जोग स्टेडियम लगत रस्त्यावर झाला आज सायंकाळी 05 : 45 च्या वाजताच्या सुमारास एका माथेफिरुने एका ९ व्या वर्गात शिकणा:या विद्यार्थीनीवर अॅसिडने हल्ला केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे . या घटनेमुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले असल्याची बाब पून्हा एकदा सिद्ध झाली आहे.

घटनास्थळी बघ्यांची प्रचंड गर्दी जमली आहे. शाळा सुटल्यानंतर कुटुंबियांची वाट पाहत ती रस्त्याच्या कडेला उभी असतांना आरोपीने तिच्यावर अॅसिड फेकले व फरार झाला. तिला तात्काळ इर्विनमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. आरोपीची ओळख अद्याप पटलेली नाही. त्याने हल्ला करण्यामागील कारणही समजू शकले नाही. पोलिस तपास करीत असून आरोपीचा शोध सुरु झाला आहे.