चांदुर रेल्वेत फार्मासिस्ट प्रशिक्षण शिबीर संपन्न

0
579
Google search engine
Google search engine

चांदुर रेल्वे – (शहेजाद खान )

अन्न व औषधी प्रशासन, महाराष्ट्र शासन व्दारा फार्मासिस्ट प्रशिक्षण शिबिर स्थानिक अग्रवाल समिति धर्मशाला येथे मंगळवारी संपन्न झाले. सदर कार्यक्रमाला अन्न व औषध प्रशासन, अमरावती विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रकाश शेंडे, औषधी निरीक्षक चंद्रमणी डांगे, उमेश घरोटे यांनी उपस्थित सर्व केमिस्ट बंधुना औषध विक्री करतांना अन्न व औषधी कायद्याचे विविध नियम व कायदे कशा प्रकारे अमलात आणावे व औषध विक्री करावी याबद्दल अत्यंत महत्वाचे व बहुमूल्य मार्गदर्शन चित्रफितच्या सहाय्याने केले.

यासोबतच अमरावती जिल्हा केमिस्ट एंड ड्रगिस्ट एसोसिएशनचे अध्यक्ष सौरभ मालाणी यांनी सुद्धा अत्यंत मोलाचे मार्गदर्शन उपस्थित केमिस्ट बांधवांना केले. या कार्यक्रमाला सचिव प्रमोद भरतिया, उपाध्यक्ष संजय शेलके, श्रीकांत राजुरकर, सहसचिव फिलिप कोठारी, कोषाध्यक्ष राजा नानवाणी , धामणगाव रेल्वे तालुका अध्यक्ष पवनजी भूरिया, परतवाडा तालुका अध्यक्ष भरत भूरिया, चांदुर रेलवे तालुका अध्यक्ष महेश भूत, महिला फार्मासिस्ट व केमिस्ट रत्न सौ.भारती मोहकार सह चांदुर रेल्वे, धामणगाव रेल्वे तालुक्यातील सर्व केमिस्ट बंधु या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन डॉ. दिलीप मोहनानी तर आभार प्रदर्शन अंकुश जोशी यांनी केले….