राष्ट्रीय शेतकी विद्यालय येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर  महापरिनिर्वाण दिन साजरा

0
610
Google search engine
Google search engine

प्रतिनिधी/गजानन खोपे

वाठोडा शुक्लेश्वर नजीक च्या येथे खोलापूर राष्ट्रीय शेतकी विद्यालयात डाँ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेचे हारार्पण आणि फोटो चे पूजन प्रभारी कैलास गजभिये यांच्या हस्ते करण्यात आले, व अभिवादन कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री कंडाळे सर यांनी केले. यावेळी जीवनावर भाषण व गीते सादर केली. आपल्या अध्यक्षिय भाषणात श्री गजभिये म्हणाले “बाबासाहेब आंबेडकरांनी हालअपेष्ठा सहन करुन बहुजनांचे जीवन प्रगती पथावर नेले. आजचे बहुजन समाजाचे उंचावलेले जीवनमान म्हणजे बाबासाहेबांची देणगी आहे.” बाबासाहेबांच्यामुळे केवळ संविधानच नव्हे तर अनेक चांगल्या गोष्टी समाजाला दिल्या. जातियतेचे चटके सहन करत त्यांनी देशाला विकासाचा मार्ग दाखवला. यावेळी संचलन कु प्रियल निमकर हिने तर आभार वैष्णवी पारडे हिने केले. कार्यक्रमाचे यशस्वितेकरिता पद्माकर मोहोड, नवले, कविटकर या,कु. सुजाता बगाडे, कु अंबाडकर तसेच शिक्षकेत्तरी कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या उपस्थित होते,