सु.श्री.अलकाश्रींचा रामकथा ज्ञानयज्ञ मंडप भूमिपूजन सोहळा सप्पन्न

0
676
Google search engine
Google search engine

प्रतिनिधी:-समीर देशमुख

शेगाव-विदर्भ मिरा प.पू.संत सु.श्री.अलकाश्रीजी यांचे संगितमय श्री रामकथा ज्ञानयज्ञ 11 जानेवारी 2018 गुरूवार पासून सुरू होत असून 15 जानेवारीपर्यंत हा ज्ञानयज्ञ चालणार आहे. त्याअनुशंगाने आज १४ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता नगराध्यक्षा सौ शकुंतला बुच व पांडुरंग बुच यांच्या हस्ते विधिवत सपत्नीक पूजापठन करण्यात आले यावेळी हभप ज्ञानेश्वर मिरगे, पुष्पाकरसेठ काठोळे दिनेशजी महाराज व्यास याच्या हस्ते विधिवत पुजाअर्चा करून कूदळ मारून श्री.अलकाश्रीं रामकथा ज्ञानयज्ञ मंडप भूमिपूजनाचा कार्यक्रम सप्पन्न झाला. येथील स्व.गजाननदादा पाटील मार्केट यार्ड येथे ११ जानेवारी ते १५ जानेवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंत हा संगितमय श्री रामकथा वाचनाचा धार्मिक कार्यक्रम होणार असून सदगुरू सेवा समिती आणि समस्त शेगाव शहरातील नागरीकांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यापुर्वी 2001 साली सु.श्री.अलकाश्रीजींच्या ज्ञानयज्ञ कार्यक्रमाचे आयोजन मोदीनगरजवळ करण्यात आले होते. 17 वर्षानंतर सु.श्री.अलकाश्रीजींचा भक्तीमय ज्ञानयज्ञ संतनगरीत होत असल्याने नागरीकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.