अन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बॅनरवर युवा जिल्हाध्यक्षाचे छायाचित्रच नाही !  तालुक्यात एकच चर्चा …

0
678
Google search engine
Google search engine

संग्रामपुर :-दयालसिंग चव्हाण :-

संग्रामपुर तालुक्यात ठिकठिकाणी मा.रविकांत तुपकर यांच्या आगमनाचे बॅनर लावण्यात आलेले असुन या बॅनरवर युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्क़र यांचे छायाचित्रच नसल्याने तालुक्यात एक चर्चा सुरु झाली आहे. यामुळे संपुर्ण तालुक्यात हा विषय राजकीय चर्चेला विषय बनला आहे. प्रत्येक गावात शाखा उघडण्याचे काम स्वाभिमानी शेतकरी संघटना करत आहे .याप्रसंगी रविकांत तुपकर यांच्याहस्ते उदघाटन होणार आहे . स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या आगमनाचे बॅनरवर तालुक्यात ठिकठिकाणी लावलेले असून या बॅनरवर तालुकाध्यक्षांचा छायाचित्र व नांव नसल्याने कार्यकर्तामध्ये नाराजी दिसुन येत आहे. त्यामुळे संग्रामपुर बस स्टँडवर लावण्यात आलेले बॅनवर युवा जिल्हाध्यक्षाचे छायाचित्र लावलेले नसल्याचे तालुक्यात चर्चेला उधान आले आहे. स्वाभिमानीमध्ये गटबाजी निर्णाण होत असल्याचे प्रकार संग्रामपुर तालुक्यात दिसायला मिळत आहे. म्हणजे दिनांक 26 डिसेंबर रोजी तालुकाध्यक्ष नाना पाटील व युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात एकाच दिवशी तहसिलदार यांना वेगवेगळया विषयाचे दोन गटात निवेदन दिले आहे. छायाचित्र बॅनरवरुन वगळल्याने या पक्षात वाद निर्माण झाल्याने संग्रामपुर तालुक्यात स्वाभिमानी पक्षात गट पडल्यात दिसुन येत आहे. या गटबाजीमुळे शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणारे संघटनेला नुकसान होणार असल्याचे चित्र दिसत आहे.